चला हवा येऊ द्याच्या मंचावर 'दगडी चाळ'चा रिमेक 'झगडी चाळ '

मुंबई : चला हवा येऊ द्याचा मंच हा महाराष्ट्राला खळखळून हसायला लावणारा मंच आहे. या मंचावर सतत हसवण्याचा उद्योग सुरू असतो. या मंचावर अनेक सिनेमे प्रमोशनसाठी येतात. अशीच एक टीम चला हवा येऊ द्या च्या मंचावर आली आहे. मकरंद देशपांडे यांचा 'ट्रकभर स्वप्न' हा सिनेमा भेटायला येत आहे. याची संपूर्ण टीम हवा येऊ द्याच्या मंचावर आली आहे. मकरंद देशपांडे यांचा 'दगडी चाळ' हा अरूण गवळी यांच्या जीवनावर आधारित सिनेमा आहे. या सिनेमाचा रिमेक येथे थुकरटवाडीत तयार करण्यात आला. ही धम्माल आपल्याला पाहता येणार आहे. 

या आठवड्यात चला हवा येऊ द्या च्या मंचावर 'ट्रकभर स्वप्न' या चित्रपटाचे कलाकार सज्ज होणार आहेत. मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर यांसारखे दिग्गज कलाकार मंचावर आल्यावर चला हवा येऊ द्या च्या विनोदवीरांनी एकच कल्ला केला. 'ट्रकभर स्वप्न'च्या टीमसाठी या विनोदवीरांनी 'दगडी चाळ' चित्रपटावर आधारित एक विनोदी स्किट सादर करून सर्वांना पोट धरून हसायला भाग पाडलं. निलेश साबळे डॅडी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.