डेझी शहावर होता हत्येचा आरोप; प्रकरण इतकं गंभीर की, सलमानही वाचवू शकला नाही!

Daisy Shah Birthday Special : डेझी शाहचा आज 39 वा वाढदिवस आहे. डेझी शाहनं एक बॅक ग्राऊंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात केली आणि आज ती एक अभिनेत्री आहे. मात्र, तिच्यावर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 25, 2023, 10:51 AM IST
डेझी शहावर होता हत्येचा आरोप; प्रकरण इतकं गंभीर की, सलमानही वाचवू शकला नाही! title=
(Photo Credit : Social Media)

Daisy Shah Birthday Special : बॉलिवूड अभिनेत्री डेझी शहाचा आज वाढदिवस आहे. डेझीचा आज 39 वा वाढदिवस आहे. तिच्या  वाढदिवसानिमित्तानं तिच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया. डेझीनं तिच्या करिअरची सुरुवात ही एक बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती. डेझी ही सुरुवातीला गणेश आचार्य यांच्या टीममध्ये असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम करायची. त्यानंतर खूप मेहनत केल्यानंतर तिनं गुजराती आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. तिनं केलेली मेहनत पाहता बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खाननं तिला मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी दिली. पण तुम्हाला माहितीये डेझी शाहचं नावं तिच्या कामासाठी नाही तर आणखी एका गोष्टीसाठी चर्चेत आलं होतं आणि ते म्हणजे तिच्यावर असलेला हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. 

डेझीवर हा आरोप कोणी आणि का केलं असा प्रश्न नक्कीच अनेकांना पडला असेल. भोजपुरी अभिनेता सत्येंद्र सिंह यांनी डेझी शाह, गणेश आचार्य, रजनीश दुग्गल आणि त्याचसोबत 'सोडा' या चित्रपटातील इतर काही कलाकारांवर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याविषयी तक्रार दाखल करत सत्येंद्र म्हणाले होते की त्यांची सोडा या चित्रपटासाठी निवड करण्यात आली होती. पण डेझीला मात्र, दुसऱ्या बड्या कलाकारासोबत काम करायचे होते. या सगळ्यामुळे मला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अशात ते पुन्हा त्यांच्या गावी परत जात असताना, त्यांचा अपघात झाला. हा अपघात नसून त्यांच्याविरोधात असलेला कट असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. डेझीवर करण्यात आलेल्या या आरोपांनंतर मात्र, तिचं करिअर संपण्यास सुरुवात झाली. अशात सलमान देखील तिला वाचवू शकला नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'इतरांच्या आयुष्यात...', हृतिकपेक्षा 12 वर्षं लहान सबा आझादनं पहिल्यांदाच नात्यावर केलं भाष्य

डेझीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं गणेश आचार्यकडून डान्सची ट्रेनिंग घेतली होती. जवळपास तीन वर्षे ती गणेश आचार्य यांची असिस्टंट होती. तिनं बॅकग्राउंड डान्सर म्हणून देखील काम केले. सलमान खानसोबतच 'जय हो' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर डेझी ही 'हेट स्टोरी' आणि 'रेस 3' या चित्रपटांमध्ये देखील दिसली. याशिवाय डेझीनं मराठी आणि अनेक इतर भाषिक चित्रपटांमध्ये काम केले. तर दगडी चाळ 2' या चित्रपटात देखील डेझी दिसली होती. तिनं या चित्रपटात आयटम सॉन्गवर डान्स केलं होतं.