'जरा तरी लाज वाटू दे', अभिनेत्रीने केली विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पतीची पोलखोल

Dalljiet Kaur Gave Separation Hint : दलजीत कौरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या नवऱ्याची केली पोलखोल

दिक्षा पाटील | Updated: May 25, 2024, 05:21 PM IST
'जरा तरी लाज वाटू दे', अभिनेत्रीने केली विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पतीची पोलखोल title=
(Photo Credit : Social Media)

Dalljiet Kaur Gave Separation Hint : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौरनं गेल्या वर्षी केनियाचा बिजनेसमॅन निखिल पटेलसोबत दुसरं लग्न केलं. पण लग्नाच्या 10 महिन्यांनंतर दलजीतच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झाला आणि काही महिन्यापूर्वीच ती भारतात परतली. मात्र, तिला भारतात परतल्याच पाहून तिचं तिच्या तिच्या दुसऱ्या पतीसोबत भांडण झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण आता दलजीतनं अखेर या चर्चांवर तिचं मौन सोडलं असून पती निखिल पटेलसोबत तिचं लग्न मोडल्याची हिंट दिली आहे.

दलजीतनं नुकतेच सोशल मीडियावर पती निखिल पटेलपासून वेगळे झाल्याचे स्पष्ट केले आहे.  दलजीतनं शनिवारी सकाळी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जाऊन पतीने म्हणजेच निखिलनं फसवणूक केल्याचा आरोप केला. दलजीतनं एक पोस्ट लिहून निखिल पटेलला 'निर्लज्ज' म्हणत संपूर्ण कुटुंबाला त्यानं 'अपमानित' केल्याचा आरोप केला. दलजीतनं निखिलची इन्स्टाग्राम स्टोरी री शेअर केली आहे ज्यावर 'SN' असं लिहीत 'you make me better' असं कॅप्शन दिलं आहे. मात्र, या कॅप्शनमध्ये SN म्हणजे काय हे जरी समोर आला नसलं तरी हे कोणाच्या तरी नावाची सुरुवातीची अक्षरे आहेत असे सांगितले जाते.

Dalljiet Kaur s second husband is having Extra Marrital Affair actress gave hint about separation

यासोबतच दिलजीतनं लिहिलं की, 'तू आता निर्लज्जपणे तिच्यासोबत दररोज सोशल मीडियावर असतो. तुझी पत्नी आणि मुलगा लग्नाच्या 10 महिन्यांनंतर परतले, संपूर्ण कुटुंबाचा अपमान झाला. तू मुलांसाठी थोडी प्रतिष्ठा ठेवायला हवी होती.' दलजीत पुढे म्हणाली, 'किमान तू सार्वजनिक ठिकाणी तुझ्या पत्नीला थोडा सन्मान द्यायला हवा होता कारण मी इतर अनेक गोष्टींबद्दलही गप्प बसलो होते.'

Dalljiet Kaur s second husband is having Extra Marrital Affair actress gave hint about separation

यापूर्वी दलजीतनं नववधूच्या वेशात मेकअप केल्यानंतर व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये  दलजीतच्या चेहऱ्यावर प्रचंड वेदना दिसत होत्या. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दलजीतनं लिहिलं होतं की, 'तिनं तिच्या मुलांच्या चांगल्यासाठी मौन राखून ठेवले आहे ... अरे एसएन, तुलाही मूल आहे का? असा म्हणत तिनं एसएन नाव असलेल्या व्यक्तीला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. 

हेही वाचा : 'बाबांची इच्छा पूर्ण झाली पण ते पाहण्यासाठी...', वडिलांविषयी बोलताना गौरव मोरे भावूक

या पोस्ट नंतर दलजीतचा पती निखिल पटेल याचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.  याशिवाय आता या पोस्टमुळे दलजीतच्या आणि निखिल पटेलचं नातं तुटल्याचेही स्पष्ट झालं आहे. याच कारणामुळे दलजीतनं लग्नाच्या 10 महिन्यांतच सर्व काही सोडून भारतात आल्याचं सांगितले जाते.

दलजीतचं दुसरे लग्न

दलजीत कौरचं पहिले लग्न अभिनेता आणि बिग बॉस फेम शालीन भानोतसोबत झालं होतं. दलजीत आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती शालीन भानोतला एक मुलगाही आहे. पण लग्नाच्या दोन वर्षानंतर दलजीत आणि शालीनचा घटस्फोट झाला. यानंतर दलजीतने निखिल पटेलसोबत दुसरे लग्न केलं.