हार्ट सर्जरीनंतर रेमो डिसूजाचा रुग्णालयातील हा डान्स व्हिडिओ व्हायरल

रेमोला आला होता हृदयविकाराचा झटका

Updated: Dec 14, 2020, 07:23 PM IST
हार्ट सर्जरीनंतर रेमो डिसूजाचा रुग्णालयातील हा डान्स व्हिडिओ व्हायरल

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक रेमो डिसूजा यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातमीने सर्वांनाच चकित केले होते.  देशभरातून नव्हे तर जगभरातील त्याचे चाहते त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. नुकतीच त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली आहे. तो सध्या रूग्णालयात असून त्याची प्रकृती चांगली असल्याची माहिती पुढे आली आहे. रेमोची पत्नी लीझेल डिसूझाने एक व्हिडिओ शेअर केला आहे जो त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाचा क्षण आहे.

रेमो डिसोजाच्या चाहत्यांना पत्नी लीझेल रुग्णालयातून सतत त्याच्या प्रकृतीविषयी माहिती देत ​​असते. आता हा व्हिडिओ शेअर करून, लीझेलने एक चांगली बातमी दिली आहे.

या व्हिडिओमध्ये रेमो डिसूजा म्यूझिकवर पाय फिरताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना लीझेलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'पायांनी नाचणे एक गोष्ट आहे आणि मनापासून नाचणे ही वेगळी गोष्ट आहे. रेमो डिसूझा... तुमच्या प्रार्थना आणि आशीर्वादासाठी सर्वांचे आभार.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Liz (@lizelleremodsouza)

रेमो डिसूजाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बॉलिवूडचे अनेक सेलेब्रिटी यावर प्रतिक्रिया देत आहे.

विशेष म्हणजे शुक्रवारी रेमो डिसूजाला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर रेमोला कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल केले गेले. रेमो डिसूजावर आयसीयूमध्ये आहे. कोरिओग्राफर म्हणून प्रसिद्ध झालेला रेमो नंतर एबीसीडी सारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून देखील चांगलाच नावाजला आहे.