...म्हणून प्रियंकाने स्वतःच्या कारमधून निकला खाली उतरवलं

लग्नाच्या दोन वर्षांनंतर प्रियंका आणि निकमध्ये असं काही झालं की...  

Updated: Dec 13, 2020, 07:34 PM IST
...म्हणून प्रियंकाने स्वतःच्या कारमधून निकला खाली  उतरवलं

नवी दिल्ली : अभिनेत्री प्रियंका चोप्रा केवळ बॉलिवूड अभिनेत्री नाही तर ग्लोबल एक्ट्रेस म्हणून ओळखली जाते. नुकताच तिच्या आणि गायक निक जोनसच्या शाही विवाहाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसाचं औचित्य साधत त्यांनी सोशल मीडियावर स्वतः अनेक फोटो देखील पोस्ट केले. लग्नाच्या दोन वर्षांनंतर प्रियंका आणि निकमध्ये असं काही झालं की ते ऐकूण तुम्हालाही मोठा धक्का बसेल. 

मीडिया रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार प्रियंकाने काही अपशब्दांचा वापर करत स्वतःच्या कारमधून निकला खाली उतरवलं. ही पहिलीचं वेळ आहे ज्यामाध्यमातून निक आणि प्रियंकामधील वाद सर्वांच्या समोर आला आहे. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल तुफान चर्चा रंगत आहे. 

सांगायचं झालं तर, या सर्व घटना त्यांच्या रियल आयुष्यातील नसून रिल लाईफमधील आहेत. डेली डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार प्रियंका आणि निक त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्यांच्या चित्रपटामधील एक भाग आहे ज्यामध्ये दोघेही एका कारमध्ये बसले आहे. दोघांमध्ये काही कारणांमुळे भांडण होतं आणि प्रियंका अपशब्दांचा वापर करत निकला कारमधून खाली उतरण्यास सांगते.