दंगल गर्ल जायरा वसीम गेल्या साडेचार वर्षांपासून डिप्रेशनने त्रस्त...

दंगल गर्ल जायरा वसीम गेल्या साडेचार वर्षांपासून डिप्रेशनने त्रस्त...

Updated: May 11, 2018, 08:58 PM IST
दंगल गर्ल जायरा वसीम गेल्या साडेचार वर्षांपासून डिप्रेशनने त्रस्त... title=

मुंबई : दंगल सिनेमात छोट्या पेहलवानची भूमिका निभावणारी अभिनेत्री जायरा वसीमने एक धक्कादायक खुलासा केला आहे. हा खुलासा तिने सोशल मीडियावर पोस्ट करुन केला. त्यात तिने लिहिले की, अखेर मी हे जाहिर करते की, खूप काळापासून मी डिप्रेशन आणि अॅनझायटी ला सामोरे जात आहे. गेल्या ४ वर्षांपासून तिला हा आजार असून त्यामुळे तिला अनेकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डिप्रेशनमुळे तिला १-२ नाही तर दरदिवशी ५ गोळ्या घ्याव्या लागतात. 

जायरा वसीमने आमिर खानच्या दंगल सिनेमात छोटी गीता फोगाटची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर तिने आमिरसोबत सिक्रेट सुपरस्टारमध्येही काम केले आहे. इतकंच नाही तर दंगल सिनेमासाठी तिला सर्वोकृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा राष्‍ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 

zaira wasim

आज जायराने इंस्टाग्राम अकाऊंटवर हा खुलासा केला. त्यात ती म्हणते, मला अनेक लोकांनी सांगितले की, तू इतकी लहान आहेस तुला डिप्रेशन होऊ शकत नाही. हा फक्त एक फेज आहे जो निघून जाईल. पण या त्रासदायक काळाने माझी हालत खराब केली आहे. मी दररोज ५ गोळ्या खाते. मला अॅनझायटीचे अॅटक येतात. अचानक रात्री बेरात्री हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागते. मला खूप रिकामे, एकटे वाटते.. तर अनेकदा खूप भिती वाटते... खूप जास्त झोपल्याने किंवा अनेक आठवडे न झोपल्याने शरीरात त्रास होतो. खूप जास्त खावे वाटते तर कधी भूकच लागत नाही... आत्महत्या करावी वाटते... आताची प्रत्येक गोष्ट या काळाचा भागच नाही असे वाटते.

'सीक्रेट सुपरस्टार' का पहला गाना हुआ रिलीज, गाने में एक सवाल कर रही हैं जायरा

पुढे तिने लिहिले की, मला माहित आहे की मला डिप्रेशन आहे. मला आठवतेय की मला पहिला अॅटक १२ वर्षाची असताना आला होता तर दुसरा मी १४ वर्षांची असताना. आता मला आठवतही नाही की असे किती वेळा झाले असेल. मात्र नेहमी असेच सांगण्यात आले की, असे काहीच नाही. इतक्या लहान वयात डिप्रेशन असूच शकत नाही. कारण डिप्रेशन फक्त २५ वर्षांच्या वरील व्यक्तींनाच होते.

जायरा पुढे लिहिते की, डिप्रेशन किंवा अॅनझायटी ही एक भावना किंवा जाणीव नाही तर हा एक आजार आहे. हा कोणत्याही वेळी कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो. सुमारे साडेचार वर्षांपासून मला डिप्रेशन आहे. आज मी माझा आजार ओळखण्यास आणि जगाला याबद्दल सांगण्यास पूर्णपणे तयार आहे. याची मला लाज, भिती वाटत नाही. 

शेवटी ती लिहिते की, मला फक्त प्रत्येक गोष्टीपासून काही काळासाठी लांब राहायचे आहे. माझ्या सोशल आयुष्यापासून, माझ्या कामापासून, शाळेपासून आणि सर्वात अधिक म्हणजे सोशल मीडियापासून. मी रमजानच्या पवित्र महिन्याची वाट पाहात आहे. कारण या गोष्टी समजून घेण्याची तीच योग्य वेळ आहे. कृपया तुमच्या प्रार्थनेत माझी आठवण ठेवा.