दयाबेनपासून रश्मी देसाईपर्यंत 'या' अभिनेत्रींनी बी ग्रेड चित्रपटांमध्ये साकारली बोल्ड भूमिका

बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी अनेक अभिनेत्रींनी बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.   

Updated: May 10, 2021, 01:56 PM IST
दयाबेनपासून रश्मी देसाईपर्यंत 'या' अभिनेत्रींनी बी ग्रेड चित्रपटांमध्ये साकारली बोल्ड भूमिका

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक प्रकारचे चित्रपट तयार होतात. त्यामधील एक म्हणजे 'बी ग्रेड' चित्रपट. आज टीव्ही किंवा मोठ्या पडद्यावर काम करणाऱ्या अभिनेत्रींपैकी अनेक अभिनेत्रींनी बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी अनेक अभिनेत्रींनी बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. काहींना चांगली संधी मिळाली तर कही मात्र बी ग्रेड चित्रपटांमधून बाहेर येऊ शकल्या नाहीत. दयाबेनपासून रश्मी देसाईपर्यंत अनेक अभिनेत्रींनी बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

अभिनेत्री दिशा वकानी

सध्या सर्वत्र चर्चेत असणारी मालिका म्हणजे, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील दयाबेनने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. पण ऐकेकाळी दिशाने देखील बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दिशा वकानीने 'कमसिन-द अनटच्ड' चित्रपटात बोल्ड भूमिका साकारली होती. 

अभिनेत्री सना खान

अभिनेता सलमान खान स्टारर 'जय हो' चित्रपटात भूमिका साकारणारी अभिनेत्री सना खानने देखील बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सनाने  ‘हाय सोसायटी’ आणि ‘क्लायमेक्स’ अशा बी ग्रेड चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती. 

अभिनेत्री रश्मी देसाई

अभिनेत्री रश्मी देसाईने देखील बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रश्मीने भोजपूरी त्याचप्रामाणे हिंदी बी ग्रेड चित्रपटांमध्य़े भूमिका साकारली आहे.

अभिनेत्री अर्चना पूरन सिंह

'द कपिल शर्मा'शोमध्ये मुख्य भूमिका साकारणारी अर्चना पूरन सिंहने देखील करियरच्या सुरूवातीला 'बी ग्रेड' चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती. ज्यामध्ये अर्चनाने अनेक बोल्ड सिन दिले होते.