close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

दाक्षिणात्य अभिनेत्याच्या फार्महाऊस परिसरात आढळला कुजलेला मृतदेह

प्रकरण गंभीर.... 

Updated: Sep 20, 2019, 08:19 AM IST
दाक्षिणात्य अभिनेत्याच्या फार्महाऊस परिसरात आढळला कुजलेला मृतदेह

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱा एक अभिनेता सध्या अडचणीत येण्याची चिन्हं आहेत. येत्या काळात त्यांच्यापुढे अडचणींचा डोंगरही उभा राहू शकतो. कारण, पापिरेड्डडीगुडा (Papireddyguda village) या गावातील त्यांच्या नावे असणाऱ्या भूखंडावरील फार्महाऊस परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला आहे. 

(Papireddyguda village) पापिरेड्डीगुडा या गावात नागार्जुन यांची जवळपास ४० एकर इतकी जमीन आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या बऱ्याच काळापासून या भूखंडावर कोणतंही काम करण्यात आलेलं नाही. त्याच परिसरात हा मृतदेह आढळला आहे. या भूखंडाच्या जवळपास शेतजमीन आहे. जेथे काम करणाऱ्या व्यक्तींना एका दिशेने दुर्गंध येत असल्याचं लक्षात आलं. ज्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. 

स्थानिक पोलिसांना याविषयीची माहिती देण्यात आली. ज्यानंतर पोलिसांनी संबंधित परिसरात तपास सुरु केला. येत्या काळात या गंभीर प्रकरणाची विस्तृत माहिती समोर येणार आहे. 

Nagarjuna

नागार्जुनची पत्नी अमला अक्किनेनी हल्लीच बऱ्याच काळानंतर या भूखंडाच्या पाहणीसाठी पोहोचली होती. पण, कोणताही अनुचित प्रकार घडल्याचा खुलासा मात्र तिच्याकडून करण्यात आला नव्हता. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा कुजलेला मृतदेह पाहता, ४- ६ महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. त्यामुळे आता त्याविषयीच्या तपासाला वेग आला आहे. अभिनेता नागार्जुन किंवा त्याच्या कुटुंबीयांपैकी कोणाकडूनही याविषयी कोणतीही माहिती उघड करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.