close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

रणवीरची अतरंगी वेशभूषा पाहून सलमानची 'ही' प्रतिक्रिया

फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

Updated: Sep 20, 2019, 08:09 AM IST
रणवीरची अतरंगी वेशभूषा पाहून सलमानची 'ही' प्रतिक्रिया

मुंबई : आयफा अवॉर्ड २०१९ यावर्षी मुंबईत पार पडला. सिनेजगतातील सगळे कलाकार यावेळी उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्याचे अनेक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोची सर्वात जास्त चर्चा होतेय आणि तो फोटो म्हणजे अभिनेता रणवीर सिंह. 

रणवीर सिंहचे कपडे हे कायमच चर्चेचा विषय असतो. त्याने कॅरी केलेला प्रत्येक लूक हा चर्चेचा विषय बनतो. असंच काहीस आयफा अवॉर्डमध्ये झालं. रणवीरच्या लूकवर चाहत्यांनीच नाही तर दस्तुरखुद्द सलमान खानने देखील प्रतिक्रिया दिली आहे. 

रणवीर सिंह आणि सलमान खानचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. जो फोटो बघून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. हा फोटो आयफा अवॉर्डमधला असून दोघं एकाचवेळी मंचावर उभे आहेत. रणवीरचा 'अवतार' बघता दबंग खानने जी प्रतिक्रिया दिली ती या फोटोत कैद झाली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@BeingSalmanKhan @RanveerOfficial #IIFAAwards #IIFA2019

A post shared by Amitesh Dubey (@amiteshdubey2712) on

रणवीर कधीही कोणत्या पुरस्कार सोहळ्याला किंवा इतर कुठे कार्यक्रमाला जातो तेव्हा सर्वात प्रथम त्याच्या ड्रेसवर साऱ्यांच्या नजरा असतात. अगदी हटके आणि वेगळेच कपडे रणवीर कॅरी करतो. आयफा अवॉर्ड २०१९ मध्ये रणवीरने ग्रे रंगाची पँट, उंच टाचाचे बूट, एक उंच शेंडी आणि गॉगल्स कॅरी केले होते. एवढंच नाही तर या सगळ्यावर त्याने एक लाल रंगाचा कपडा कॅरी केला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I purple you...

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

त्याला हा लूक बघून सलमान स्टेजवर असताना पुढे सरकला. त्याने रणवीर सिंहच्या लाल रंगाच्या कपड्याने चक्क आपलं तोंड पुसलं आहे. सलमानच्या या रिअॅक्शनमुळे पुरस्कार सोहळ्यात एकच हसा पिकला. रणवीरच नाही तर यावेळी दीपिका सुद्धा चित्रविचित्र ड्रेसमध्ये पाहायला मिळाली.