पद्मावतच्या यशाबद्दल दीपिकाने असे मानले आभार...

वादग्रस्त ठरलेल्या पद्मावत चित्रपटाला प्रदर्शनानंतर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 10, 2018, 09:50 PM IST
पद्मावतच्या यशाबद्दल दीपिकाने असे मानले आभार... title=

मुंबई : वादग्रस्त ठरलेल्या पद्मावत चित्रपटाला प्रदर्शनानंतर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. म्हणूनच दीपिकाने खास पद्धतीने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर ४०० कोटींचा गल्ला केलेल्या या चित्रपटाच्या यशाबद्दल दीपिकाने एक खास व्हिडिओ शेअर करत सर्वांचे आभार मानले.

राणी पद्मावतीच्या रुपात तिने सर्वांचे आभार मानले. हा व्हिडिओ तिने तिच्या ट्विटर हॅंडलवरून शेअर केला. राणी पद्मावतीचे रुप आणि घुमरच्या ठेक्यावर आभार मानतानाचा हा व्हिडिओ तुम्हीच पहा...

पद्मावत चित्रपटात दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनेक वादातून सुटत २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला केला. तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने २३६ कोटींची मजल मारली. आता पुढे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतोय, हे पाहणे औत्सुक्याचे ठऱणार आहे.