मुंबई : अखेर खूप मोठ्या प्रतिक्षेनंतर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह विवाह बंधनात अडकले. 14 नोव्हेंबरला दीपवीरचं इटलीतील लेक कोमोमध्ये कोकणी पद्धतीने लग्न पार पडलं. या भव्य शाही सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.
एएनआयने ट्विट केलेल्या व्हिडिओत आपण पाहू शकतो वर रणवीर सिंह आपल्या मंडळींना घेऊन घोड्यावरून नाही तर पाण्याच्या मार्गाने सी प्लेनने घेऊन आला. वरपक्षाचं स्वागत अतिशय धुमधडाक्यात फटाक्यांच्या रोशनाईने करण्यात आलं. रंग बिरंगी फटाके फोडून रणवीरचं स्वागत झालं.
रणवीर सिंह सी प्लेनमधून घेऊन आला मंडळी
वरपक्षातील मंडळी पाण्याच्या मार्गाने लक्झरी याटमध्ये बसून पोहोचले
इटलीच्या भव्य लेक कोमोमध्ये भव्य शाही सोहळा
रंगीबेरंगी फटाक्यांनी केलं स्वागत
लग्नासाठी कोकणी पेहरावात सजली दीपिका पदुकोण
आज 15 नोव्हेंबर रोजी सिंधी पद्धतीने लग्न होणार आहे. यावेळी दीपिका लाल आणि सोनेरी रंगाचा लेहंगा जो सब्यसाचीने डिझाईन केला आहे तो घालणार आहे. हा विवाह सोहळा 2 दिवस चालणार आहे. रणवीर सिंह सिंधी असल्यामुळे आज त्या पद्धतीने लग्न होणार आहे.
2014 मध्ये आलेल्या संजय लीला भन्साळी यांच्या 'राम-लीला'च्या सेटवर या दोघांमध्ये प्रेम वाढलं. आता चाहत्यांमध्ये हे दोघं दीपवीर या नावाने ओळखले जातात. रामलीला प्रमाणेच बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या सिनेमांतही एकत्र काम केलं आहे.