रणवीरमुळं दीपिकावर आली 'ही' वेळ, नाईलाजानं सर्वांसमोरच खुलासा

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगची जोडी बॉलिवूडमधील सर्वात खास जोडप्यांपैकी एक आहे.

Updated: Aug 13, 2021, 07:43 PM IST
रणवीरमुळं दीपिकावर आली 'ही' वेळ, नाईलाजानं सर्वांसमोरच खुलासा  title=

मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगची जोडी बॉलिवूडमधील सर्वात खास जोडप्यांपैकी एक आहे. या दोघांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. रणवीर एक मस्तीखोर व्यक्ती आहे आणि दीपिकाने त्याच्यासोबत राहण्यासाठी अनेक गोष्टी स्वीकारल्या आहेत. दीपिका नेहमी तिच्या बॅगमध्ये सुई आणि धागा घेऊन जाते.

दीपिका सुई आणि धागा घेऊन जाते
'द कपिल शर्मा शो' मध्ये पोहोचलेल्या दीपिका पदुकोणला कपिलने तिच्याशी संबंधित काही अफवा सांगितल्या होत्या, ज्याला दिपीकाने तिच्या स्वतःच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. कपिलने नंतर दीपिकाला सांगितलं की, तिच्याबद्दल एक अफवा देखील होत होती की, ती तिच्या बॅगमध्ये सुई-धागा आणि सेफ्टी पिन ठेवते.

कार्यक्रमात पँट फाटली होती
दीपिकाने ही वस्तुस्थिती स्वीकारली आणि म्हणाली, रणवीर कधीकधी खूपच उड्या मारतो यामुळे काहीवेळा त्याचे कपडे फाटू शकतात, म्हणूनच मी त्याच्यासोबत असताना कायम सुई-धागा घेऊन जाते. यानंतर दीपिकाने रणवीरशी संबंधित एक किस्साही शेअर केला. तिने सांगितलं की, बार्सिलोना येथे एका म्यूजिक फेस्टिवल महोत्सवादरम्यान हा किस्सा घडला होता. रणवीरने काही लूज पँट घातली होती आणि तो काही विचित्र डान्स स्टेप्स करत होता. मध्येच, डान्स करता करता रणवीरची पँट फाटली, मग मी त्याला म्हणाले थांब, यानंतर मी माझ्या बॅगमधून सुई आणि धागा काढला. प्रत्येकजण पार्टीत नाचत होते आणि मी ईथे त्याची पँट शिवत होते.

दीपिकाने दाखवले फोटो
यानंतर, दीपिकाने त्यावेळचे फोटोही दाखवले, ज्यात ती खरंच रणवीरची पँट शिवताना दिसत आहे. हा किस्सा ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सगळे लोक हसू लागले. त्याचवेळी, हे ऐकल्यावर कपिल शर्मा म्हणाला- 'रणवीर सिंह खरोखरच एक लकी नवरा आहे.'

दीपिका आणि रणवीर
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचं अफेअर संजय लीला भन्साळी यांच्या रामलीला चित्रपटापासून सुरू झालं. या चित्रपटात दोन्ही स्टार्स मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटानंतर या दोघांच्या अफेअरच्या बऱ्याच बातम्या आल्या. दीपिकाने नेहमीच रणवीरसोबतचे संबंध नाकारले असले तरी एक रणवीर होता ज्याच्या डोळ्यात दीपिकावरील प्रेम स्पष्ट दिसत होतं. जेव्हा दोघांनी अधिकृतपणे लग्नाची घोषणा केली तेव्हा चाहत्यांनी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आता दोघेही त्यांचं वैवाहिक जीवन आनंदाने जगत आहेत.