दीपिका ठरली जगातली सर्वात सेक्सी आशियाई महिला

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन हीची पहिल्यांदाच जगातल्या सर्वात सेक्सी आशियाई महिला म्हणून निवड झाली आहे. दीपिकाने चार वेळा विजेती ठरलेल्या प्रियंका चोप्राला मागे टाकत या यादीत पहिल्या क्रमांकावर जागा मिळवली आहे.

Updated: Sep 18, 2017, 10:30 AM IST
दीपिका ठरली जगातली सर्वात सेक्सी आशियाई महिला title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन हीची पहिल्यांदाच जगातल्या सर्वात सेक्सी आशियाई महिला म्हणून निवड झाली आहे. दीपिकाने चार वेळा विजेती ठरलेल्या प्रियंका चोप्राला मागे टाकत या यादीत पहिल्या क्रमांकावर जागा मिळवली आहे.

ही वार्षिक यादी ‘इस्टर्न आय’ या ब्रिटनच्या वृत्तपत्रात देण्यात आली आहे. 

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

‘ट्रिपल एक्स: रिटर्न ऑफ जेंडर केज’ या सिनेमात विन डिझेल सोबत दिसलेल्या दीपिकाने यावर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, ‘याने माझ्या चेह-यावर स्मित आलंय. पण वेगवेगळ्या लोकांसाठी सेक्सी या शब्दाचा अर्थही वेगळा असतो. माझ्यासाठी हे केवल शारिरीक नाहीये. आत्मविश्वास सेक्सी आहे. साधेपणा आणि भापडेपणा सेक्सी आहे’.

 

some Tuesday fun!Get this look only at @allaboutyoufromdeepikapadukone for Rs.1379/- link in bio!

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

२०१६ मध्ये सेक्सी महिला निवडण्यासाठी जगभरातील लाखो लोकांनी वोट दिलं. प्रियंका चोप्रा दुस-या क्रमांकावर, निया शर्मा तिस-या स्थानावर आणि आलिया भट पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या दहा अभिनेत्रींमध्ये सनाया इराणी(सहाव्या), कतरिना कैफ(सातव्या, सोनम कपूर(आठव्या), माहिरा खान(नवव्या) आणि गोहर खान(१०व्या) क्रमांकावर आहे.