मुंबई : बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत दीपिका पदुकोणने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. दीपिका यंदाची मोस्ट पावरफुल 100 लोकांची लिस्ट जाहीर केली आहे. यामध्ये नाव येणारी दीपिका पदुकोण ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री बनली आहे. पद्मावत या सिनेमाबद्दल दीपिकाची लोकप्रियता आणखी वाढली आहे.
टाइम्स मॅगझीनने दिलेल्या माहितीनुसार, सर्वात प्रभावशाली असलेल्या व्यक्तींची टाइमची वार्षिक सूची जाहीर केली आहे. या सूचीनुसार आताचा वेळ हा या कलाकारांचा आहे. दीपिकासोबतच यंदा भारतीय क्रिकेट कॅप्टन विराट कोहली आणि ओला कॅबचा को फाऊंडर भावीश अग्रवालचा देखील समावेश आहे.
मॅगझीनच्या या कलाकारांच्या लिस्टमध्ये निकोल किडमॅन, स्टर्लिंगचे ब्राऊन, रयान कुगलर आणि गेल गेडट यासोबतच गायिका रिहाना, जपानी, प्रंतप्रधान शिंजो आबे, उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन, कनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, बांग्लादेशचे पंतप्रधान शेख हसीना, सऊधी अरबचे शहजादे मोहम्मद बिन सलमान, चीनी राष्ट्रपती शी चिनफिंग आणि आयरलँडचे भारतीय मूळ असलेले पंतप्रधान लियो वराडकर देखील सहभागी आहेत.
टाइम मॅगझीन दरवर्षी जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. यंदा ही मॅगझीन 15 वी यादी आहे त्यामुळे मॅगझीन यंदाची असणार आहे.