'या' दिवसात तू अशी कसं वागू शकतेस? गरोदरपणात हाय हील्स घातल्यामुळं दीपिकावर चाहत्यांचा रोष

काही दिवसांपूर्वीच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगनं चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. त्यानंतर आता नुकतंच 'क्लकी 2898 एडी' सिनेमाच्या प्रीरिलीज इवेंटला दीपिकाने हजेरी लावली. इवेंटमधले तिचे बेबी बंपमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, काही नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं, तर काहींनी मात्र तिला ट्रोल केलं आहे.   

Updated: Jun 20, 2024, 12:07 PM IST
'या' दिवसात तू अशी कसं वागू शकतेस? गरोदरपणात हाय हील्स घातल्यामुळं दीपिकावर चाहत्यांचा रोष  title=

रणवीर आणि दीपिका, घरी येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी खूपच उत्सुक आहेत. त्यामुळे दोघंही सध्या कॅमेरापासून लांब राहत कुटुंबासोबत वेळ व्यतीत करताना दिसत आहेत. दीपिका आणि रणवीरने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर गुड न्यूज शेअर केली. त्यावेळी चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींदेखील या दोघांचं भरभरुन कौतुक केलं. मात्र या सगळ्या बरोबरच दीपिकाला काही जणांनी ट्रोल देखील केलं. 
तिची प्रेग्नंसी खोटी आहे, असं म्हणत युजर्सकडून तिला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर दीपिकाने तिच्या इंस्टाग्रामवर बेबी बंपचे फोटो पोस्ट करत ट्रोलर्सना चांगलीच चपराक दिली. पण, आताही ती ट्रोल होतच आहे. यामागचं कारण माहितीय? 

नुकताच 'क्लकी 2898 एडी' या सिनेमाचा प्रीरिलीज इवेंट पार पडला.  या आगामी सिनेमात दीपिकासोबत प्रभास आणि अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. सिनेमाच्या  प्रीरिलीज इवेंटला दीपिकाने हजेरी लावली होती. सहा महिन्याच्या प्रेग्नंट दीपिकाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तिचे हे बेबी बंप फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दीपिकाने या इवेंटमध्ये हाय हिल्स घातल्यामुळं अनेकांनीच तिला निशाण्यावर घेतलं.  'प्रेग्नंसीमध्ये एवढ्या हाय हिल्स सॅन्डल तू कसं काय वापरु शकतेस?' असं एका युजरने म्हटलं, तर सेलिब्रिटी कायम त्यांच्या लुककडे जास्त लक्ष देतात हे मान्य आहे, पण 'या दिवसात हाय हिल्स सॅन्डल बाळासाठी चांगलं नाही', अशा कमेंट देखील करण्यात आल्या. 

 

याआधी देखील दीपिकाची प्रेग्नंसी खोटी आहे, अशी अफवा देखील सोशल मीडियावर पसरवण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच दीपिकाने तिच्या प्रेग्नंसीचे फोटो शेअर केल्यावर या चर्चांना पूर्णविराम मिळाला.  'क्लकी 2898 एडी' या सिनेमाच्या सेटवर दीपिकाची टीमने खूप काळजी घेतली. 'कल्की'चा संपूर्ण स्टाफ दीपिकाच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायचा. सेटवर तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी संपूर्ण टीम जबाबदारीने वागत होते. असं प्रभासने मुलाखतीत सांगितलं.