नवी दिल्ली : बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत अपले वर्चस्व स्थापन करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. 'द व्हाइट टायगर' या चित्रपटाच्या शूटींगसाठी ती दिल्लीमध्ये आहे. पण दिल्लीतील वाढत्या प्रदुषणच्या पातळीमुळे प्रियांकाला त्या ठिकाणी शूटिंग करणं कठीण जात आहे. त्यामुळे तिने सोशल मीडियावर मास्क लावून एक फोटो शेअर केला आहे.
स्वत: च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ''द व्हाइट टायगर' चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. पण येथे शूटिंग करणं फार कठीण आहे. तर या परिस्थितीत दिल्लीत राहणं कसं शक्य आहे. आपल्याकडे एअर प्युरिफायर आणि मास्क यांसारख्या सुविधा आहेत.' असे लिहिले आहे.
Just landed in Delhi,the air here is just unbreathable.Absolutely disgusting what has become of this city.The pollution is visible, dense smog. People arein masks. How much more disaster does one need to wake up and do the right thing? Tell ourselves we are wrong. #DelhiBachao
— arjun rampal (@rampalarjun) November 2, 2019
आपलं राहणं फार कठीण आहे, तर गरीब आणि बेघर लोक कसे राहतील असे वक्तव्य तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. त्याचप्रमाणे अभिनेता अर्जुन रामपालने देखील दिल्लीच्या प्रदुषणावर चिंता व्यक्त केली आहे.
प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढल्याने नवी दिल्लीत आरोग्य आणीबाणी देखील जाहीर करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दिल्लीतल्या शाळांना पाच नोव्हेंबरपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. पंजाब आणि हरियाणात खरिपाचा हंगाम निघाल्यानंतर शेतजमिनी जाळल्या जातात.