मुंबई : मराठी टेलिव्हिजनवर सासु सूनांच्या मालिका आपण पाहत आलोय, काही रिअॅलिटी शो ही लोकांच्या चांगल्याच पसंतीस पडत आहे. या मालिका, रिअॅलिटी शोजच्या भाऊगर्दीत देवा शप्पथ नावाची एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
देव आणि माणसाच नात श्रद्धेवर आधारलेल असतं. मंदिरातील देव आपल्याला माहित असतो पण २१ व्या शतकात देवाने माणसांच्या भेटीला यायच ठरवल तर ते कस असेल ? काही विचार केलाय ? यावर जास्त विचार करण्याची आता गरज नाही. कारण देवा शप्पथ ! मालिकेतून तुम्हाला या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
देवा शप्पथ या मालिकेत देव म्हणजेच खट्याळ कृष्ण उर्फ आजचा क्रिशच्या भूमिकेत क्षितिश दाते हा अभिनेता दिसणार आहे . देव म्हटला की श्रद्धा अंधश्रद्धा मानणारे, न मानणारे आलेच. त्यामूळे नास्तिक भक्ताची भूमिकाही यात महत्त्वाची असणार आहे. नास्तिक श्लोकची भूमिका संकर्षण खराडे
करणार आहे.
देवाकडे पाहण्याचा एक वेगळा पण पारदर्शक दृष्टिकोन घडवणारी ही मालिका असल्याचे बोलले जात आहे. देव या संकल्पनेकडे विचार करायला लावणारी आणि त्याच बरोबर निखळ आनंद देणारी एक मालिका झी युवाचा माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
विद्याधर जोशी, सीमा देशमुख, स्वानंद बर्वे, शाल्मली टोळ्ये, अभिषेक कुलकर्णी, कौमुदी वालोकर, चैत्राली गुप्ते, आनंदा कारेकर आणि अतुल तोडणकर हे कलाकार मुख्य भुमिकेत दिसणार आहेत.
झी युवा या वाहिनीवर सोमवार २० नोव्हेंबर पासून रात्री ९:३० वाजता देवा शप्पथ ! सर्वांच्या भेटीला येत आहे. अश्रद्धा आणि अतिश्रद्धा यात समन्वय साधायला आलेल्या देवाची गोष्ट देवा शप्पथ या मालिकेतून उलगडणार नाही.