चार मिनिटांचा किसिंग सीन; 91 वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालणाऱ्या सीनचा PHOTO व्हायरल

First Longest Kiss Scene: भारतीय सिनेविश्वामध्ये सर्वाधिक वेळासाठीचा किसिंग सीन कोणी दिला होता आणि कोणत्या चित्रपटात हे दृश्य होतं माहितीये?   

सायली पाटील | Updated: Oct 17, 2024, 01:36 PM IST
चार मिनिटांचा किसिंग सीन; 91 वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालणाऱ्या सीनचा PHOTO व्हायरल  title=
Devika Rani kiss scene Indian Cinema First Longest Kiss Scene

First Longest Kiss Scene: चित्रपट असो किंवा एखादी सीरिज, हल्ली बऱ्याच कलाकृतींमध्ये इंटिमेट सीनचा भरणा असतो. मागील काही वर्षांमध्ये इंटिमेट सीनचं सादरीकरण पाहता त्यांची मांडणी करण्याची पद्धतही काळानुरूप बदलली. पण, 30 आणि 40 च्या दशकामध्ये हिंदी कलाजगतामध्ये कलाकृतीमध्ये अशी काही दृश्य असणं म्हणजे एक अतिशय मोठी बाब होती. त्या काळात काही कलाकार मंडळीसुद्धा अशी दृश्य साकारताना दोनदा विचार करत होती. 

मात्र एक अशीही अभिनेत्री होती, जिनं बेधडकपणे एक बोल्ड सीन दिला आणि रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घातला. या अभिनेत्रीनं दिलेला किसिंग सीन हिंदी कलाजगतातील पहिला सर्वात मोठा किसिंग सीन ठरला. जवळपास एक दशकभर हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करणारी ही अभिनेत्री होती, देविका रानी. पतीला सोडून सहकलाकारासोबत पळून गेलेल्या देविका रानी या जेव्हा माघारी आल्या तेव्हा त्यांनी सर्वांच्या नजरा वळवल्या. 

'तो' किसिंग सीन आजही चर्चेचा विषय... 

1933 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कर्मा' या चित्रपटात देविका रानी यांचा किसिंग सीन लक्ष वेधणारा ठरला. या चित्रपटामध्ये त्यांनी हिमांशू रॉय यांच्यासोबत तो लिपलॉक सीन दिला होता. जवळपास चार मिनिटांसाठीचा हा सीन असून हा तोच काळ होता जेव्हा महिलांनी चित्रपटांमध्ये काम करणं हीसुद्धा एक मोठी बाब होती. त्यातच या अभिनेत्रीनं तर सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या, त्यामुळं याची प्रचंड चर्चा झाली. कथानकानुसार हे कोणतंही प्रणयदृश्य नसून, हिमांशू रॉय यांना उठवण्यासाठी त्यांनी किस केल्याचं तिथं दाखवण्यात आलं होतं. 

हेसुद्धा वाचा : लहान मुलांसमोर विवस्त्र होणंसुद्धा बाल लैंगिक शोषण, POCSO अंतर्गत गुन्हा! हायकोर्टाचा निकाल

 

प्रत्यक्ष आयुष्यात देविका रानी आणि हिमांशू रॉय हे पती- पत्नी होते. त्यामुळं हे दृश्य ते सहजपणे चित्रीत करू शकले. पण, या दृश्यानं अनेकांनाच हादरा बसला होता. काहींनी तर चित्रपटावर बंदी आणण्याचीही मागणी केली. देविका रानी यांचा हा पहिला चित्रपट असून, त्याचं दिग्दर्शनही हिमांशू रॉय यांनीच केलं होतं. 

कसं गेलं बालपण? 

अतिशय धनाढ्य कुटुंबात जन्मलेल्या देविका रानी यांना 9 वर्षांच्या वयातच इंग्लंडला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्यात आलं. तिथंच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. 1928 मध्ये त्यांची भेट हिमांशू रॉय यांच्याशी झाली आणि पुढच्याच वर्षी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. देविका रानी यांचा पहिला चित्रपट इंग्लंडमध्ये प्रदर्शित झाला. पण, भारतात मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला. चित्रपटानं देविका रानी यांना मात्र एक वेगळी ओळख दिली हेसुद्धा खरं.