Dhaakad:अमिताभ बच्चन यांच्यावर भडकली कंगना रनौत, काय आहे कारण

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत अॅक्टींगसह आपल्या विविध वक्तव्यांमूळे चर्चेत असते. सध्या ती बॉलिवूडचे शहनशाह बीग बी अमिताभ बच्चन यांच्यावर भडकल्यामुळे चर्चेत आली आहे. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला व्हिडिओ अचानक डिलीट केल्यामुळे कंगना त्यांच्यावर भडकली आहे. तसेच माझ्या चित्रपटाचे कौतुक केल्यामुळे इंडस्ट्री त्यांच्यावर बहिष्कार टाकेल,अशी भिती वाटत असल्याची टीका कंगणाने बच्चन यांच्यावर केली आहे.  

Updated: May 11, 2022, 07:19 PM IST
 Dhaakad:अमिताभ बच्चन यांच्यावर भडकली कंगना रनौत, काय आहे कारण  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत अॅक्टींगसह आपल्या विविध वक्तव्यांमूळे चर्चेत असते. सध्या ती बॉलिवूडचे शहनशाह बीग बी अमिताभ बच्चन यांच्यावर भडकल्यामुळे चर्चेत आली आहे. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला व्हिडिओ अचानक डिलीट केल्यामुळे कंगना त्यांच्यावर भडकली आहे. तसेच माझ्या चित्रपटाचे कौतुक केल्यामुळे इंडस्ट्री त्यांच्यावर बहिष्कार टाकेल,अशी भिती वाटत असल्याची टीका कंगणाने बच्चन यांच्यावर केली आहे.  

लॉकअप होस्ट केल्यानंतर कंगना आता आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात गूंतली आहे. या चित्रपटातील गाण्याचा नुकताच टीझर लॉंच झाला. हाच टीझर अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर करत टीमला शुभेच्छा दिल्या होत्या.

मात्र काही वेळानंतरचं अमिताभ बच्चन यांनी हा टीझर डिलीट केला. बच्चन यांच्या या भूमिकेवर कंगना राणौत फार भडकली. तसेच माध्यमांशी बोलताना तिने बच्चन यांच्यावर टीका केली.   

चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कंगनाला, धाकडच्या ट्रेलरची बॉलीवूड स्टार्सनी प्रशंसा केली नाही? असा सवाल विचारला होता. यावर कंगनाने, "काही लोकांमध्ये वैयक्तिक असुरक्षितता असते, काही लोकांना भीती असते की माझ्या किंवा माझ्या चित्रपटाचे कौतुक केल्यामुळे इंडस्ट्री त्यांच्यावर बहिष्कार टाकेल, अशी टीका केली. 
 
 कंगना पुढे म्हणते, "नक्कीच लोकांच्या आवडीनिवडी आणि नापसंती आहेत. परंतु हे इतके धक्कादायक आहे की बच्चन साहेबांनी ट्रेलर ट्विट केला आणि नंतर त्यांनी तो पाच-दहा मिनिटांत काढून टाकला. त्यांच्यासारख्या सुपरस्टारवर कोण दबाव आणेल. माझ्यावर नाही. तुम्हाला माहिती आहे असेही ती म्हणाली. 

कंगनाचा धाकड सिनेमा 20 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. कंगना राणौत शिवाय या चित्रपटात अर्जुन रामपाल, शाश्वत चॅटर्जी आणि दिव्या दत्ता यांच्याही मुख्य भूमिका आहेत.