फोटोत झीनत अमान यांच्यासोबत स्त्रीवेषात आहेत दिग्गज अभिनेते; ओळखू शकाल?

Dharmendra in Female Role: धर्मेंद्र हे आपल्या सगळ्याचेच आवडते कलाकार होते. सध्या त्यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. यावेळी त्यांना रूपेरी पडद्यावर पाहून प्रेक्षकांना फारच आनंद झाला आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगेलली पाहायला मिळाली होती. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 9, 2023, 01:54 PM IST
फोटोत झीनत अमान यांच्यासोबत स्त्रीवेषात आहेत दिग्गज अभिनेते; ओळखू शकाल? title=
August 9, 2023 | dharmendra once played a female character in the film katilon ke kaatil with actress zeenat aman

Dharmendra in Female Role: 70-80 च्या दशकात धर्मेंद्र हे सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते होते. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या तोडीस तोड असा त्यांचा अभिनय होताच. आज वयोमनानं धर्मेंद्र हे वयस्कर झाले असले तरीसुद्धा त्यांच्या अभियनयाचे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. आजही त्यांची चार्मिंग पर्सनॅलिटी आपल्याला भुरळ घालते. सध्या त्यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट प्रचंड गाजतो आहे त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनची. परंतु हे सोडलं तर या वयातही त्यांनी रूपेरी पडद्यावर सादर केलेला आपला अभिनय हा प्रेक्षकांचे मनं जिंकून घेणाराच आहे. रांधवा कुटुंबियांतील प्रमुख म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व हे चांगलेच प्रभावी होते. दोन महिन्यांपुर्वी त्यांच्या नातवाच्या लग्नात ते स्पॉट झाले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. यावेळी 80 व्या वयात सुद्धा त्यांनी आपल्या नातव्याच्या लग्नात दाखवलेला जलवा पाहून भलेभले घायाळ झाले होते. 

सध्या त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो. यावेळी ते फारच वेगळ्या अशा पोशाखात दिसत आहेत. त्यांनी चक्के फिमेल कॅरेक्टर प्ले केल्याचे कळून येते आहे. त्यांच्या बाजूला उभी असलेली नायिकाही फार लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यांच्या बाजूला झिनत अमान आहेत. तुम्ही कदाचित हा फोटो पाहून गोंधळून जाल. कारण यावेळी त्यांना या वेशात ओळखणंही फार कठीण झालं आहे. तुम्हाला कादाचित हा चित्रपट कोणता हेही आठवत नसेल. हा चित्रपट 80 च्या दशकात आला होता ज्याचे नावं होते 'कातिलों के कातिल'. या चित्रपटातून तुम्ही पाहु शकाल की धर्मेंद्र यांचा वेगळाच लुक समोर आलेला आहे. 

हेही वाचा - 'मैं डॉन हूँ...' Don 3 चा पहिला लूक; शाहरुख नव्हे रणवीर सिंगला पाहून अंगावर आले शहारे, पाहा Video

ज्येष्ठ अभिनेत्री झनीत अमात आता इन्टाग्रामवरही सक्रिय आहेत. त्यामुळे त्या आपले जुने फोटोही सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. यावेळी झीनत अमात यांनी आपला धर्मेंद्र यांच्यासोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. हा चित्रपट 1981 साली आला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी झीनत अमान यांनी मुलांचे आणि धर्मेंद्र यांनी मुलीप्रमाणे गुलाबी फॉक्र आणि हॅट परिधान केली आहे.