Waheeda Rehman यांनी धर्मेंद्रला म्हणाल्या फ्लर्टिंग... आता धर्मेंद्र यांनी दिलं उत्तर 'हम ......'

धर्मेंद्र यांनी या मंचावर एक किस्सा देखील सांगितला. जेव्हा वाहीदा रहमान यांनी कबूल केले होतं की मी, धर्मेंद्र यांची क्रश होते. या संपूर्ण संभाषणाचा व्हिडिओ या शोच्या ऑफिशिअल पेजवर आहे, ज्यामध्ये धर्मेंद्र गंमतीशीर बोलताना दिसत आहेत.

Updated: Apr 9, 2021, 09:11 PM IST
 Waheeda Rehman यांनी धर्मेंद्रला म्हणाल्या फ्लर्टिंग... आता धर्मेंद्र यांनी दिलं उत्तर 'हम ......'

मुंबई : बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र कदाचित यापुढे पडद्यावर दिसणार नाही, पण एक काळ असा होता की धर्मेंद्रची चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेज होती. धर्मेंद्र याना ही-मॅन म्हणून ओळखलं जात असे. त्या काळातल्या सामान्य मुली सोडा, अभिनेत्रीही त्यांच्याकडे आकर्षित झाल्या होत्या. धर्मेंद्र 'डान्स दिवाना 3' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये पोहोचले होते, यावेळी त्यांनी सांगितलं ते वाहिदा रेहमानवर फिदा होते. या कार्यक्रमात त्यांनी इतकंच सांगितलं नव्हे तर, धर्मेंद्र यांनी या मंचावर एक किस्सा देखील सांगितला. जेव्हा वाहीदा रहमान यांनी कबूल केले होतं की मी, धर्मेंद्र यांची क्रश होते. या संपूर्ण संभाषणाचा व्हिडिओ या शोच्या ऑफिशिअल पेजवर आहे, ज्यामध्ये धर्मेंद्र गंमतीशीर बोलताना दिसत आहेत.

धर्मेंद्र बॉलीवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हासोबत या कार्यक्रमात सहभागी झाले होते. व्हिडिओमध्ये असं दिसून येत आहे की, या कार्यक्रमाचा एक स्पर्धक धर्मेंद्रच्या 'पल पल दिल पास तुम तुम रती हो' या गाण्यावर परफॉर्म करतो. परफॉर्मन्स पाहिल्यानंतर धर्मेंद्र म्हणतात, 'हे गाणं माझ्या अगदी जवळच आहे, मला या गाण्यामध्ये अभिनय करायचा नव्हता, मी अभिनय केला नाही. मला फक्त या गाण्यात रोमांन्स करायचा होता '. हे सांगत धर्मेंद्र जोरात हसले. त्याच्या या वक्तव्यावर शत्रुघ्न सिन्हा असं म्हणाले, 'एखाद्याला खरंच ही- मैन टायटल मिळालं असतं तर तो धर्मेंद्र भाऊ आहे. मिळाली, तर तो आमचा धर्मेंद्र भाऊ आहे, एवढा लाजत राहिलात म्हणून हि मॅन बनलात'

यानंतर राघवने धर्मेंद्र यांना एक व्हिडिओ दाखविला ज्यामध्ये वाहिदा रहमान म्हणत आहे की 'धर्मेंद्र चेहऱ्यावरुन खूप साधे भोळे दिसतात, पण खरंतर ते तसे नाही आहेत, खऱ्या आयुष्यात ते खूप फ्लर्टिंग आहेत'. वाहिदाचे हा व्हिडिओ ऐकून सगळेजण हसू लागतात आणि धर्मेंद्र संपूर्ण किस्सा सांगतात. धर्मेंद्र म्हणतात, 'मी त्यांचा' चौदहवीं का चांद' हा चित्रपट पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर मी त्यांच्यावर खूप फिदा झालो

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

धर्मेंद्र यांनी पुढे म्हणाले की, 'मी वहीदा जींचा एका कार्यक्रमाचा व्हीडिओ पाहिला होता, ज्यात तिला काही कलाकारांची फोटो दाखविण्यात आली होता आणि विचारले होतं की तुमचा क्रश कोण आहे? वाहिदा जी त्वरित म्हणाल्या 'धर्मेंद्र'  म्हणून मी विचार करतो जेव्हा आम्ही फिदा होतो तेव्हा काय झालं होतं. धर्मेंद्रचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.