गुगलही वैतागलं! ढिंच्याक पूजाचे व्हिडिओ यूट्यूबवरून गायब

आपल्या बेसूर आणि कर्कश आवाजाने सोशल मिडीयावर प्रसिध्द असलेल्या पूजासाठी ही खूपच वाईट बातमी आहे. मंगळवारी यूटयूब चैनेलवरून तीच्या सर्वच विडीयो गायब झाले. अजूनपर्यंत याची काहीच माहीती मिळाली नाही. तीचे विडीयो यूटयूबने काढलीय का, नाहीतर मग हॅकरची करामत आहे. बुधवारी सकाळी तीच्या चॅनेल वर फक्त ‘दिलो का शूटर’ हे एकच गाणं दिसत होते.

Updated: Jul 12, 2017, 06:08 PM IST
गुगलही वैतागलं! ढिंच्याक पूजाचे व्हिडिओ यूट्यूबवरून गायब title=

नवी दिल्ली : आपल्या बेसूर आणि कर्कश आवाजाने सोशल मिडीयावर प्रसिध्द असलेल्या पूजासाठी ही खूपच वाईट बातमी आहे. मंगळवारी यूटयूब चैनेलवरून तीच्या सर्वच विडीयो गायब झाले. अजूनपर्यंत याची काहीच माहीती मिळाली नाही. तीचे विडीयो यूटयूबने काढलीय का, नाहीतर मग हॅकरची करामत आहे. बुधवारी सकाळी तीच्या चॅनेल वर फक्त ‘दिलो का शूटर’ हे एकच गाणं दिसत होते.

ढिंच्याक पूजाचे आत्ता पर्यंत चारच गाणे आले आहे. काही दिवसांपूर्वीच ‘सेल्फी मैंने ले ली आज’ सोशल मिडीयावर खूप वायरल झालं होतं. त्यानंतर अजून एक गाणं ‘दिलों का शूटर है मेरा स्कूटर’ पण आलं.

आपल्या बेसूर गाण्याने ती सोशल मिडीयाची सेंसेशन बनली आहे. तीच्या यूटयूब चैनेलवर आत्तापर्यंत १.८ लाख सब्सक्राबर्स आहे. पूजाच्या बेसूर आवाजाने सोशल मिडीयावर खूप गंम्मत उडवली जाते. अलीकडेच ‘दिलों का शूटर’ या गाण्यामध्ये तिने हेलमेटशिवाय स्कूटर चालवली आहे. तिच्या विरोधात दिल्ली पोलीसांनी एफआयआर दाखल केला आहे.