मुस्लिम घरात जन्माला येऊन ब्राम्हणांप्रमाणे वागायचा 'हा' अभिनेता; एकेकाळी हिंदू धर्मही स्वीकारायला झाला तयार, पण अर्धवटच राहिली इच्छा

बॉलिवूडमध्ये आपलं नशिब अनुभवण्यासाठी अनेक कलाकार येतात. पण या कलाकाराला अभिनेता नाही तर क्रिकेटर व्हायचं होतं. पण त्याला अभिनय क्षेत्रात नशिबाने ओढून आणलं. आज तो लाखो लोकांच्या गळ्यातील ताईत आहे.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 7, 2025, 10:41 AM IST
मुस्लिम घरात जन्माला येऊन ब्राम्हणांप्रमाणे वागायचा 'हा' अभिनेता; एकेकाळी हिंदू धर्मही स्वीकारायला झाला तयार, पण अर्धवटच राहिली इच्छा  title=

आजचा दिवस अनेक कारणांनी महत्त्वाचा आहे. त्यातील एक महत्त्वाचं कारण म्हणजे अभिनेता इरफान खानचा आज 58 वा वाढदिवस आहे. गेल्या काही वर्षांत अनेक मात्तबर कलाकार आपल्याला सोडून गेले त्यातील एक अभिनेता म्हणजे इरफान खान. 29 एप्रिल 2020 रोजी इरफान खानचे ट्यूमरमुळे निधन झाले. अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट 'अंग्रेजी मीडियम' होता. या चित्रपटाला त्याच्या चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. याशिवाय त्यांनी शेक्सपियरच्या कादंबरीवर आधारित मकबूल, हासिल, हिंदी मीडियम, तलवार या चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांचा जन्म राजस्थानमधील टोंक येथे झाला. मुस्लिम कुटुंबातील असूनही त्यांनी कधीही मांसाहार केला नाही. इरफान खान शेवटपर्यंत शाकाहारी राहिले. यामुळेच त्यांच्या घरातीलच मंडळी त्यांना 'ब्राह्मण' म्हणत.

इरफान खानने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये आपल्या खाण्याच्या सवयी आणि मांसाहार न करण्याबद्दल सांगितले आहे. अभिनेत्याचे पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान होते. ते मुस्लिम पठाण कुटुंबातील होते. एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला होता की, मुस्लिम कुटुंबातून असूनही त्याला मांसाहार करायला आवडत नाही.

अभिनेत्याने सांगितले होते की, तो लहानपणापासून शाकाहारी आहे. तो नॉनव्हेज खात नसल्यामुळे त्याच्या घरातील लोक त्याला थट्टेने ब्राह्मण म्हणत. त्यांचे वडील म्हणायचे की त्यांच्या घरी ब्राह्मण जन्माला आला आहे. अहवालात असेही म्हटले आहे की अभिनेत्याचे वडील त्याला शिकार करायला घेऊन जायचे, परंतु इरफान यांना प्राणी मारणे आवडत नव्हते. त्याला रायफल कशी वापरायची हे माहित होते पण तरीही त्यांनी कधीही शिकार केली नाही. इरफानला प्राणी आवडायचे हे देखील एक कारण होते.  

क्रिकेटर बनायचं होतं 

इरफानचा जन्म 7 जानेवारी 1967 रोजी राजस्थानमधील जयपूर येथे मुस्लिम पठाण कुटुंबात झाला. इरफानला अभिनेता नाही तर क्रिकेटर व्हायचे होते. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत इरफान खानने याचा खुलासा केला होता, 'एक काळ होता जेव्हा मी क्रिकेट खेळायचो. सीके नायडू स्पर्धेसाठी माझी निवड झाली. त्यात माझे 29 मित्र निवडले गेले होते ज्यांना शिबिरात जायचे होते, पण पैशाअभावी मी जाऊ शकलो नाही. इरफान खानने नंतर अभिनयासाठी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेशही घेतला. प्रवेश घेतल्यानंतर काही वेळातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर 4 दिवसांनी त्याची आई वारली. इरफान खानने बॉलिवूडमध्ये आपली अमिट छाप सोडली आहे.

करायचं होतं धर्मपरिवर्तन 

अभिनेता सुतापाला पहिल्यांदा NSD म्हणजेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये भेटला होता. दोघेही बरेच दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. अभिनेता सुतापाच्या घरी देखील जायचा, पण जेव्हा त्यांच्या लग्नाची वेळ आली तेव्हा अभिनेत्याने सुतापाला सांगितले होते की जर त्याच्या आईची इच्छा असेल तर तो तिचे धर्मांतर करू शकतो. मात्र, आईने नकार दिल्याने दोघांनी लग्न केले.