मुंबई : कॉन्ट्रोवर्सी क्वीन कंगना राणावत लागोपाठ आपल्या दाव्यांनी सर्वांना धक्के देत आहे. २०१४ मध्ये हृतिकला पाठवलेल्या कथित ई-मेलमध्ये कंगनाने रणबीर कपूरचा सुद्धा उल्लेख केलाय.
तिने तिच्या ई-मेलमध्ये लिहिले की, तिने RK(रणबीर कपूर)ला फिजिकल रिलेशन हवंय का?, असं विचारलं आहे.
त्या ई-मेलमध्ये कंगनाने लिहिले की, ‘त्याने मला क्वीन सिनेमाआधी कधीही अटेंशन दिलं नव्हतं. काही इव्हेंट्समध्ये त्याच्याकडून माझ्यासोबत भावासारखा व्यवहार मिळाला होता. पण जेव्हा त्याने फॅंटमच्या ऑफिसमध्ये क्वीनचे फुटेज पाहिले. तेव्हा त्याने बीबीएमवर माझ्याशी संपर्क केला आणि मला फंकी लिंक्स, व्हिडिओज पाठवू लागला’.
या ई-मेलमध्ये पुढे आहे की, ‘जेव्हा मी ग्वालियरमध्ये ‘रिव्हॉल्वर रानी’चं शूटींग करत होते. तेव्हा त्याने माझ्याशी सरळ अप्रोच केला. मी त्याला सरळ सांगितले की, मी दुस-याच्या प्रेमात आहे. त्यानंतर बराच वेळ मी टेन्शनमध्ये होते.(त्यावेळी तू माझ्या बर्थ डेला आला होता आणि आपल्यात टेन्शन वाढलं होतं. मी तुझं नाव घेतलं नाही, पण जर मी तुझं नाव त्याला सांगितलं असतं तर कदाचित त्याने मला समजून घेतलं असतं’.)
कंगना पुढे म्हणाली की, ‘त्यानंतर जेव्हा आपण ऎकमेकांच्या संपर्कात नव्हतो, तेव्हा मी न्यूयॉर्कमध्ये होती. त्यावेळी त्याने(रणबीर)ने मला विचारले की, न्यूयॉर्क कसे आहे? तेव्हा मी त्याला विचारले की, काय तुला माझ्यासोबत फिजिकल रिलेशनशिप ठेवायचंय? तर तो थोडा घाबरला आणि त्याने विचारले की, काय एक रेग्युलर रिलेशनशिप नाही करू शकत? तर मी म्हणाले की, मी आधीच प्रेमात आहे. मला वाटतं हे त्याला वाईट वाटलं’.
कंगनाचा ई-मेल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण एका मुलाखतीत तिने हृतिक रोशनसोबत आणखीही काही कलाकारांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर ब-याच उशीरा अभिनेता हृतिक रोशन याने सोशल मीडियात याप्रकरणावर त्याची बाजू मांडण्यासाठी मोठी पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने कंगनाचे सगळे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.