मराठमोळी अभिनेत्री वयाच्या ६०व्या वर्षी अडकली लग्नबंधनात

पुन्हा एकदा होतेय चर्चा 

Updated: Nov 26, 2020, 01:53 PM IST
मराठमोळी अभिनेत्री वयाच्या ६०व्या वर्षी अडकली लग्नबंधनात

मुंबई : छोट्या आणि मोठ्या पडद्यावर लक्षवेधी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये.  यांनी वयाच्या ६० व्या वर्षी २०११ मध्ये लग्न केलं. या लग्नाची आता पु्न्हा चर्चा होत आहे. 

१९६९ मध्ये आपल्या करिअरला सुरूवात केलेल्या सुहासिनी यांनी आतापर्यंत ५३ सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्या आपल्या फिटनेससाठी कायमच चर्चेत असतात. 'लगान' सिनेमात आमिर खानच्या आईच्या भूमिकेत सुहासिनी दिसल्या होत्या. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रेमाला आणि लग्नाला वयाचं बंधन नसतं हे सुहासिनी यांनी दाखवून दिलं. सुहासिनी यांनी ६५ वर्षीय अतुल गुर्ते यांच्याशी लग्न केलं. अतुल हे फार्टिसल फिजिसिस्ट असून यांच हे दुसरं लग्न आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

१६ जानेवारी २०११ रोजी सुहासिनी आणि अतुल यांनी लग्न केलं. अतुल यांच्या पहिल्या पत्नीचे कॅन्सरमुळे निधन झाले. तर सुहासिनी यांच एक ब्रेकअप झाल्यानंतर त्यांनी कधी लग्नाचा विचार केला नव्हता. मात्र अतुल यांची ऑनलाईन ओळख झाल्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.