तैमूरच्या शाळेची इतकी फी....

तैमूर शाळेत 3 शब्द शिकला

तैमूरच्या शाळेची इतकी फी....  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूरचा  मुलगा तैमूर कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतो. तैमूर आता 15 महिन्यांचा झालाय पण कमी वयातच तो सेंटर ऑफ अॅट्राक्शन होत चालला आहे. अनेकदा तैमूरच्या क्यूटनेसमुळे तो चर्चेत येतो पण आता कारण आहे त्याची शाळा आणि शाळेची फी. सध्या सोशल मीडियावर तैमूरच्या शाळेच्या फीवर भरभरून चर्चा होत आहे. 

तैमूरचं नुकतंच एका शाळेत अॅडमिशन झालं आहे. या शाळेची फी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. एवढ्या मोठ्या स्टारचा मुलगा असणारा तैमूर कमी फी असलेल्या शाळेत जात आहे. ही फी एवढी कमी आहे की, सामान्य घरातील मुलं देखील याच शाळेत जातात. 

तैमूरच्या शाळेची फी इतकी? 

वेबसाईटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तैमूरच्या नव्या शाळेची फी ही महिन्याला 5 हजार रुपये आहे. या शाळेत तीन महिन्याची फी डिपॉझिट म्हणून भरावी लागते. तैमूरसाठी करीना - सैफने 15 हजार रुपये भरले आहे. ही शाळा 6 महिन्याकरता 22 हजार आणि 47 वर्षाकरता हजार रुपये चार्ज करतात. महत्वाचं म्हणजे या शाळेत फक्त एकच दिवस शिकवलं जातं तर बाकीच्या दिवसांत फक्त खेळ खेळले जातात. 

तैमूर हे 3 शब्द बोलायला शिकला 

नुकतेच सैफ अली खानने शेअर केल्यानुसार, तैमूर आता 3 शब्द बोलायला शिकला आहे. तैमूर मला 'अब्बा' अशी हाक मारत आहे. त्यापुढे तैमूर 'बेबी' आणि 'गम' असे आणखी 2 शब्द बोलायला शिकला आहे. तैमूर गम म्हणजे च्वींग गम असं बोलतो. च्वींग गम खायला तैमूरला आवडतं.