डिंपल कपाडिया हिंदुजा रूग्णालयात दाखल

डिंपल यांना भेटण्यासाठी अक्षय रूग्णालयात पोहोचला.

Updated: Nov 16, 2019, 07:47 PM IST
डिंपल कपाडिया हिंदुजा रूग्णालयात दाखल

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारची सासू आणि ट्विंकल खन्नाची आई डिंपल कापडिया यांना हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु त्यांच्या आजाराचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. गुरूवारी अक्षय कुमारला रूग्णालयाबाहेर स्पॉट करण्यात आले होते. त्यामुळे अक्षय आजारी असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु तो डिंपल यांना भेटण्यासाठी रूग्णालयात पोहोचला होता. 

डिंपल त्यांच्या आगामी 'टेनर' चित्रपटामध्ये व्यस्त आहेत. चित्रपटाच्या कथेची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी हॉलिवूड दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांच्या खांद्यावर आहे. चित्रपटच्या शूटिंग दरम्यान त्यांना गेटवे ऑफ इंडिया येथे स्पॉट करण्यात आले होते.

क्रिस्टोफर नोलन लिखित आणि दिग्दर्शित 'टेनर' चित्रपट रहस्यमय कथेवर आधारलेला आहे. ऍक्शनने परिपूर्ण असलेला हा चित्रपट जुलै २०२० रोजी रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.