आता इंस्टाग्रामवर चालणार 'गुरूजीं'ची शाळा

'मिर्झापूर 2'चा ट्रेलर रिलीज 

Updated: Nov 16, 2019, 06:15 PM IST
आता इंस्टाग्रामवर चालणार 'गुरूजीं'ची शाळा

मुंबई : 'गँग ऑफ वासेपुर' (Gangs of Wasseypur) ते 'सेक्रेड गेम्स' (Sacred Games)पर्यंत लक्षवेधी भूमिका करणारा अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi)सोशल मीडियावर आपलं अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर आपलं अकाऊंट सुरू केलं आहे. अगदी 5 तासांत 5679 नेटीझन्सनी पंकज त्रिपाठी यांना फॉलो केलं आहे. 

ऍमेझॉन प्राईम (Amazon Prime) वरील मिर्झापूर (Mirzapur) ही वेबसिरिज अतिशय लोकप्रिय ठरली. या मालिकेला आज एक वर्ष पूर्ण झालं असून आजच मिर्झापूर 2 (Mirzapur 2) चा टीझर रिलीज झाला आहे. या वेबसिरीजमध्ये पंकज त्रिपाठी यांनी कालिनभैयाची भूमिका साकारली आहे. 

मिर्झापूर वेबसिरीजला एक वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून पंकज त्रिपाठीने इंस्टाग्रामवर एन्ट्री केली आहे. 'हम बनाएँगे instagram को मिर्जापूर' अशी कॅप्शन देत पंकज त्रिपाठी यांनी एन्ट्री केली आहे.

 

मिर्झापूर 2 बद्दल बोलताना पंकज त्रिपाठी म्हणतो की,'मला कायम विचारलं जातं की, सिझन 2 कधी रिलीज होणार असं अनेकदा मला विचारलं जायचं. सिझन 2 साठी मी देखील उत्सुक होतो. मिर्झापूरच्या पहिला वाढदिवसाचं औचित्य साधून माझं इंस्टाग्राम अकाऊंट सुरू केल्यामुळे मला त्याचा आनंद आहे.'