मुंबई : 'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्री दीपिका कक्कड तिच्या लग्नानंतर अभिनय क्षेत्रात फारशी सक्रिय नाही. मात्र ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संपर्कात असते. दीपिका तिचे वैवाहिक जीवन एन्जॉय करताना नेहमी दिसते. पण अलीकडेच ती एका व्हिडिओमध्ये रडताना दिसली आणि अभिनेत्रीने स्पष्टपणे सांगितलं की, तिने एक जवळचा मित्र गमावला आहे.
व्हिडिओ शेअर
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कड यांच्या घरात सध्या शोकाचं वातावरण आहे. दीपिका स्वतः खूप दुःखी आहे. त्याचं मोठे कारण म्हणजे त्याच्या कुटुंबातील एक लाडका सदस्य त्यांना सोडून गेला आहे. या कपलना त्या सदस्याच्या जाण्याचं दु:ख पचवता येत नाहीये. दीपिका आणि शोएबने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करून त्या सदस्याचे महत्त्व सांगितलं आहे.
शोएब आणि दीपिका खूप रडले
शोएब इब्राहिमने त्याच्या यूट्यूबवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. जे पाहून त्याच्या चाहत्यांना अश्रू आवरता येणार नाहीत. याचं कारण म्हणजे या व्हिडिओमध्ये हे स्टार्स स्वतः रडत आहेत. शोएबची पत्नी दीपिकाही या व्हिडिओमध्ये आहे. दीपिकाने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की, तिच्या घरातील सर्वात प्रिय सदस्य 'कडल' यांचं निधन झालं आहे. कडल हे त्यांच्या 'कुत्र्या'चं नाव आहे. या कपलने आपल्या कुत्र्याला आपल्या कुटुंबातील सदस्य मानलं होतं. दीपिकाने तिच्या भावना चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.