close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'टायगरच्या संगतीचा परिणाम', दिशाचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

दिशा तिच्या सौंदर्याकडे आणि फिटनेसकडे विशेष लक्ष देते.

Updated: Aug 13, 2019, 07:26 PM IST
'टायगरच्या संगतीचा परिणाम', दिशाचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनीने 'एमएस धोनी' या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिच्या करियरला चांगलीच झळाळी मिळाली. दिशा तिच्या सौंदर्याकडे आणि फिटनेसकडे विशेष लक्ष देते. त्याचप्रमाणे ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक फोटो आणि फिटनेस व्हिडिओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

kick starting the day

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोर धरताना दिसत आहे. नेटकऱ्यांकडून तिच्या या व्हिडिओला चांगलीच दाद मिळत आहे. तिच्या एका चाहत्याने 'टायगरच्या संगतीचा परिणाम' असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे अन्य चाहत्यांनी देखील तिच्या व्हि़डिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

काहीदिवसांपूर्वी दिशा-टायगरच्या ब्रेकअपच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. दोघांना फिरताना कॅमेऱ्यात टिपण्यात आले, त्यानंतर दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना अखेर पूर्णविराम लावण्यात आले.