close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'सेक्शन ३७५' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

रिचा पिडितेला न्याय मिळवून देणार का?

Updated: Aug 14, 2019, 06:11 PM IST
'सेक्शन ३७५' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : अक्षय खन्ना आणि रिचा चड्डा स्टारर आगामी 'सेक्शन ३७५' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. चित्रपटात ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये काम करणारी एक मुलगी आणि तिच्यावर झालेल्या बलात्काराबाबत अक्षय आणि रिचा एकमेकांविरुद्ध खटला लढताना दिसणार आहेत. 

चित्रपटातून पुन्हा एकदा महिलांचा छळ आणि बलात्काराच्या गुन्ह्यावर लागल्या जाणाऱ्या कलमाबाबत दाखवण्यात येणार आहे. 

चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवर ट्रेंड होतोय. 'सेक्शन ३७५'च्या टीमने सोशल मीडियावरुन चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.

ट्रेलरमध्ये अक्षय बलात्कार करणाऱ्या आरोपीचा वकील आहे. तर रिचा पिडितेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. 

अजय बहल यांनी 'सेक्शन ३७५' चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. तर भूषण कुमार, किशन कुमार, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १३ सप्टेंबर रोजी 'सेक्शन ३७५' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.