Malyalam Actor Mohanlal Net Worth : मल्याळम चित्रपटसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून लैंगिक अत्याचार आणि महिलांचे शोषण होत असल्याच्या अनेक गोष्टींमुळे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. इंडस्ट्रीमध्ये महिलांच्या समस्येला घेऊन बनवण्यात आलेल्या हेमा कमिटीच्या रिपोर्ट समोर आल्यानंतर, मल्याळम अभिनेत्री या न घारबतात समोर येत आहेत इतकंचय नाही तर त्यांच्यासोबत घटलेल्या घटनांचा खुलासा करत आहे. या संबंधीत समोर आलेल्या अभिनेत्री मीनू कुरियनचं प्रकरण खूप मोठं झालं आहे. मीनूनं एक फेसबूक पोस्टमध्ये मल्याळम इंडस्ट्रीच्या काही कलाकार आणि टेक्नीशियन्सवर लैंगिंक आणि व्हर्बल अब्यूज करण्याचा आरोप केला आहे. आता तिनं या प्रकरणात कायदेशीर कारवाई देखील केली आहे. या सगळ्यात अभिनेता मोहनलाल हे चर्चेत आले आहेत. त्यांनी राजीनामा दिला. अशात आता सगळीकडे त्यांच्या खासगी आयुष्याची देखील चर्चा रंगली आहे.
मोहनलाल हे 1977-78 या काळात राज्यस्तरीय कुश्ती खिताब जिंकल्यानंतर दिल्लीच्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये त्यांची स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत भाग घेण्याआधी त्यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी ऑडिशन देण्यासाठी फोन आला आणि त्यानंतर सगळं काही बदललं. मल्याळम चित्रपटसृष्टीतून कोणत्या चित्रपटाला ऑस्करसाठी पाठवण्यात आलं होतं तर तो चित्रपट मोहनलाल यांचा होता. या चित्रपटाचं नाव गुरु होतं तर हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. 2001 मध्ये मोहनलाल यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेता आहेत ज्यांना IIFA पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना हिंदी चित्रपट कंपनीमध्ये काम करण्यासाठी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्याशिवाय इंडियन टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नलची मानद रँक मिळवणारे मोहनलाल हे पहिले भारतीय अभिनेते आहेत.
मोहनलाल यांनी तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय निर्माते के बालाजी यांची लेक सुचित्राशी लग्न केलं. त्यांना दोन मुलं असून प्रणव मोहनलाल आणि विस्माया मोहनलाल अशी त्यांची नावं आहेत. प्रणव देखील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एकूण संपत्ती...
मोहनलाल हे लग्झरीयस आयुष्य जगतात. त्यांच्या संपत्तीविषयी बोलायचं झालं तर त्याचं ऊटीमध्ये एक घर आणि जगातील सर्वात उंच बिल्डिंग असलेल्या बुर्ज खलीफामध्ये एक फ्लॅट आहे. त्याशिवाय त्यांचं दुबईत Mohanlal Tastebuds नावानं एक रेस्टॉरंट देखील आहे. त्यांच्याकडे जवळपास 6 लक्झरी गाड्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्यांच्याकडे एकूण संपत्ती ही 376 कोटींची आहे.
दरम्यान, रिपोर्ट्सनुसार, मीनूनं त्या 7 लोकांच्या ई मेल द्वारे लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली. त्यांच्यावर मीनूनं तिच्या फेसबूक पोस्टवरून आरोप केले होते. याच मल्याळम अभिनेता आणि CPIM आमदार मुकेश, अभिनेता जयसूर्या आणि इदवेला बाबू यांच्या नावांचाही समावेश आहे. फेसबकूवर ज्या प्रोफाइलवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात मीनूचं नाव मीनू मूनीर आहे आणि तिनं नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की 'मल्याळम इंडस्ट्रीमध्ये माझ्यावर लैंगिक आणि व्हर्बल अत्याचार करण्यात आल्याची घटनेची रिपोर्ट करण्यासाठी शेअर केली. ज्यात असे म्हटले की मुकेश, मनियन पिल्ला राजू, इदावेला बाबू, जयसूर्या, एडव्होकेट चंद्रशेखरन आणि प्रोडक्शन कंट्रोलर-नोबल आणि विचू देखील सहभागी होते.'
हेमा कमिटीनंतर मल्याळम चित्रपटसृष्टीत सुरु असलेला सगळा गोंधळ पाहता एक मोठी घटना समोर आली आहे. मल्याळम इंडस्ट्रीच्या असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट्सच्या सगळ्या सदस्यांनी राजीनामा दिलाय. रिपोर्ट्सनुासर, हेमा कमिटीच्या रिपोर्टनंतर, गवर्निंग बॉडीच्या काही सदस्यांवर लैंगिक छळाच्या आरोपांची नैतिक जबाबदारी घेत AMMA च्या संपूर्ण प्रशासकीय समितीने राजीनामा दिला आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील आयकॉन मोहनलाल हे या असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि त्याची ही 17 सदस्यांची कार्यकारी समिती होती.
हेही वाचा : तुरूंगात कॉफीचा आनंद घेत सिगारेटचे झुरके घेणाऱ्या अभिनेत्याचा फोटो समोर आल्यानंतर मोठा निर्णय; आता...
असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार, 2 महिन्याच्या आत असोसिएनशच्या जनरल बॉडीची मीटिंग होईल, ज्यात नवीन गवर्निंग बॉडी निवडण्यात येईल. एका वक्तव्यात असे म्हटले आहे की 'आम्हाला आशा आहे की AMMA ला एक नवीन नेतृत्त्व मिळेल, ज्यात AMMA वर असलेला जो विश्वास आहे तो परत येईल. टीका आणि मार्गदर्शनासाठी सगळ्यांचे आभार.'