तुरूंगात कॉफीचा आनंद घेत सिगारेटचे झुरके घेणाऱ्या अभिनेत्याचा फोटो समोर आल्यानंतर मोठा निर्णय; आता...

Actor Got VIP Treatment In Prison : अभिनेत्याला तुरुंगात मिळाली VIP ट्रिटमेंट कॉफीचा आनंद ते सिगारेटचे झुरके... फोटो समोर येताच मोठा निर्णय

दिक्षा पाटील | Updated: Aug 28, 2024, 10:20 AM IST
तुरूंगात कॉफीचा आनंद घेत सिगारेटचे झुरके घेणाऱ्या अभिनेत्याचा फोटो समोर आल्यानंतर मोठा निर्णय; आता... title=
(Photo Credit : Social Media)

Actor Got VIP Treatment In Prison : दाक्षिणात्य अभिनेता दर्शन थुगुडेपा हा चाहत्यांच्या हत्ये प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. नुकतीच दर्शनची दुसऱ्या तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. त्याचं कारण म्हणजे रविवारी त्याचा कर्नाटकातील पारप्पाना अग्रहारा या कारागृहातील फोटो व्हायरल झाला होता. या कारागृहाच्या लॉनमध्ये त्याचा कॉफी पितानाचा आणि इतर तीन लोकांसोबतच फिरतानाचे फोटो देखील समोर आले होते. हे फोटो समोर आल्यानंतर त्याला देण्यात आलेल्या स्पेशल ट्रिटमेंटवरून मोठा वाद निर्माण झाला होता. 

या व्हायरल झालेल्या फोटोत अभिनेता दर्शन थुगुडेपा तुरुंगातील लॉनमध्ये असलेल्या एका खुर्चीवर बसल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर त्याच्या हातात सिगरेट आणि कॉफी मग पडकल्याचे दिसत आहे. त्याशिवाय तुरुंगातून तो व्हिडीओ कॉलवर एका व्यक्तीशी बोलत असल्याचे पाहायला मिळाले. त्याचा एक कथित व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

समाचार एजेंसी पीटीआयनुसार, मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी यासंबंधीत असं म्हटलं की 'दर्शनच्या प्रकरणात आम्ही तपासाची मागणी केली आहे. तुरुंगाचे मुख्य अधीक्षकसोबत 9 लोकांना निलंबित करण्यात आलं आहे. जर आणखी कोणाला निलंबित करण्यात आलं तरी आम्ही करू.' पुढे त्यांना विचारण्यात आलं की दर्शनला बेल्लारी तुरुंगात पाठवण्यात येईल? त्यावर मुख्यमंत्री उत्तर देत म्हणाले की 'त्याला कोणत्या तुरुंगात पाठवण्यात येईल हे पोलिस ठरवतील.'

गृहमंत्री जी परमेश्वर म्हणाले की, राज्यातील तुरुंगांमधील सर्व व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एका आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की दर्शनला दुसऱ्या तुरुंगात हलवण्याचा निर्णय सरकार घेऊ शकत नाही. त्याविषयी सांगत ते पुढे म्हणाले, या गोष्टीचा संपूर्ण निर्णय हा तुरुंग अधिकारी न्यायालय आणि इतर प्राधिकरणांशी चर्चा करून घेण्यात येतो. यावर सरकार निर्णय घेत नाही. दर्शन आणि त्याच्या सहआरोपींवर सुरु असलेल्या खटल्यांवर असलेल्या निकषाच्या आधारावर अधिकारी निर्णय घेतील. 

गृहमंत्री जी परमेश्वर म्हणाले की तुरुंगात काही त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. कैद्यांना एका बॅरेकमधून दुसऱ्या बॅरेकमध्ये घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली हे सीसीटीव्हीमध्ये कैद झालं. हे पाहता कारागृह अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांनी म्हटलं की 9 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यातं आले आहे. इतकंच नाही तर मुख्यअधिकारी आणि अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. त्यासोबत त्यांनी म्हटलं की दर्शन आणि त्याच्या ग्रुपला खुर्च्या, कॉफी, सिगारेट देऊन ज्यांनी मदत केली त्यांना निलंबित करण्यात आले आहे. या सगळ्या गोष्टी सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. त्यावरूनच सगळ्यांना निलंबित करण्यात आले आहे.'