Eka Kaleche Mani Web Series : आपण अनेक कॉमिडी मालिका पाहतो... शो पाहतो आणि चित्रपट पाहतो... पण कॉमेडी वेब सीरिज या जास्त प्रमाणात पाहायला मिळत नाहीत. त्यात मराठी कॉमेडी वेब सीरिज तर नाहीच असं म्हणायला हरकत नाही. असे अनेक मराठी प्रेक्षक आहेत ज्यांना एक मराठी कॉमेडी वेब सीरिज पाहण्याची इच्छा आहे. आता त्या सगळ्यांना एक मोठा प्रश्न असा आहे की कधी आपल्याला एक मराठी कॉमेडी वेब सीरिज पाहायला मिळेल. असं असताना आता सगळ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे सगळ्या मराठी प्रेक्षकांना हसवण्यासाठी कॉमेडी वेबसीरिज येणार आहे.
या वेब सीरिजचं नाव 'एका काळेचे मणी’ या वेबसीरिजमध्ये प्रत्येत पिढ्यांमध्ये कसा संघर्ष असतो ते विनोदी पद्धतीनं दाखवलं आहे. ही वेब सीरिजमध्ये मराठी कुटुंबावर आधारीत आहे. वडिलांच्या काय चिंता आणि त्यांच्यावर काय जबाबदाऱ्या असतात ते पाहायला मिळत आहे. तर एक आई म्हणून तिला कशी मुलांच्या लग्नाची चिंता असते ते पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे त्यांची मुलगी एक प्राणीप्रेमी आहे, पाळीव प्राण्यांसाठी कपड्यांचा ब्रॅन्ड तयार करण्याचे तिचे स्वप्न आहे. मुलगा आयर्लंड मध्ये पीएचडीचे शिक्षण घेतोय आणि पीएचडी नंतर पुन्हा भारतात येण्याचा त्याचा मानस आहे. लग्न जुळवण्याच्या खटपटीत कुटूंबाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर विनोद निर्मिती होते. या सीरिजची निर्मिती एकापेक्षा एक कलाकृतींची निर्मिती केलेले महेश मांजरेकर, ऋतुराज शिंदे आणि ऋषी मनोहर यांनी केली आहे. ही वेब सीरिज तुम्ही आज पासून जिओ सिनेमावर पाहू शकतात. या वेब सीरिजच्या माध्यमातून हास्य कलाकारांना एकत्र पाहूण प्रेक्षकांचा आनंद गगनावर गेला आहे असं म्हणायला हरकत नाही.
हेही वाचा : "काय बाई, साडीवर परकर तरी मॅचिंग घालायचा"; Manasi Naik ची उडवली जातेय खिल्ली
या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता प्रशांत दामले हे ओटीटीवर पदार्पम करत आहेत. प्रशांत दामले हे श्री काळेंच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत ऋता दुर्गुळे, समीर चौघुले, विशाखा सुभेदार, दत्तू मोरे आणि पौर्णिमा मनोहर दिसणार आहेत. या वेबसीरिजचे दिग्दर्शन अतुल केळकर यांनी केले आहे.