The Kerala Story On OTT: विपुल अमृतलाल शाह यांच्या प्रॉडक्शन हाऊस निर्मित ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपटाने रिलीज झाल्यावर जोरदार चर्चा झाली, वाद झाला आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी देखील ठरला. या चित्रपटाने तब्बल 200 कोटींची कमाई केली आहे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज केले जातात. अशातच आता द केरला स्टोरी या चित्रपटाला मात्र, ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT platform) मिळत नसल्याचं पहायला मिळतंय.
चित्रपटाच्या निर्मात्यांना अद्याप प्रमुख OTT प्लॅटफॉर्मवरून कोणतीही चांगली डील मिळाली नाही. अदा शर्मा हिची प्रमुख भूमिका असलेला आणि सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला 'द केरला स्टोरी' हा चित्रपट तुम्ही घरी बसून कधी पहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष असताना आता चित्रपटाला प्लॅटफॉर्म मिळत नसल्याचं दिसतंय. फिल्म इंडस्ट्री त्यांच्या विरोधात कट कारस्थान करत असल्याचा आरोप चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी केला आहे.
आम्हाला अजूनही कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मकडून म्हणावी तशी ऑफर मिळालेली नाही. आम्ही प्रयत्न करत आहोत, असं त्यांनी सांगितलंय. मला असं वाटतंय की फिल्म इंडस्ट्री आमच्या विरोधात उभी राहिलीये आणी आम्हाला शिक्षा देऊ पहात आहे. आमच्या चित्रपटाची कमाई पाहून बऱ्याच लोकांच्या पोटात दुखत असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. कोणतेही मोठे ओटीटी प्लॅटफॉर्म हा चित्रपट (The Kerala Story) घेण्यास तयार नाही आहेत, मात्र लवकर सिनेमा रिलीज होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
आणखी वाचा - शाहरुखला मानधनाच्या बाबतीत Thalapathy Vijay नं टाकलं मागे, Leo साठी घेतलं इतकं मानधन
दरम्यान, या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी मुख्य भूमिकेत आहेत. केरळमधील काही तरुणींना कशा प्रकारे आयसीसीच्या मार्गावर नेलं जातं, यावर त्यांनी भाष्य केलंय. काहींनी या चित्रपटाचं कौतूक केलं होतं. तर काहींनी चित्रपटावर टीका केली होती. चित्रपटातील अनेक दाव्यांवर वाद देखील पेटला होता. त्यामुळे देशभर या चित्रपटाची चर्चा झाली होती.