एलन मस्क 'या' बॉलिवूड सिनेमाच्या प्रेमात

ट्विट शेअर करून खास भारतीय चाहत्यांना दिलं गिफ्ट 

एलन मस्क 'या' बॉलिवूड सिनेमाच्या प्रेमात  title=

मुंबई : जगातील श्रींमतांपैकी एक श्रीमंत एलन मस्क (Elon Musk) टेस्ला कारवाले गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. याच मुख्य कारण म्हणजे अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये तयार केलेला रस्ता आणि तिथे धावणारी कार. सध्या त्याच्या या महत्वकांक्षी प्रोजेक्टमुळे तो लोकांमध्ये खूप चर्चेत आहे. 

पण असत असताना आता मात्र तो चक्क बॉलिवूड सिनेमा आणि एका लोकप्रिय गाण्यामुळे सोशल मीडियावर अटेंन्शन मिळवत आहे. ते म्हणजे त्याने शेअर केलेलं एक ट्विट. 

या ट्विटमध्ये आपण बॉलिवूडचा 'बाजीराव मस्तानी' हा सिनेमा पाहण्यात व्यस्त असल्याचं सांगत आहे. स्वतः मस्कने याची माहिती ट्विटर हँडलवरून दिली आहे. 

एलन मस्क सध्या अंतराळात टूर प्रोग्राम बनवण्याची योजना आखत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो यावर काम करत असल्याचं आपल्याला माहित आहे. 

मस्कची कंपनी SpaceX जगातील लोकांनी अंतराळाच दर्शन घडवण्यासाठी तयारी करत आहे. पण आता या सगळ्या बिझी शेड्युलमधून त्याने बाजीराव मस्तानीची ही Giff इमेज शेअर करून त्याने आपल्या भारतीय चाहत्यांना गिफ्ट दिलं आहे. 

या पोस्टमधून त्याने आपल्या सगळ्या चाहत्यांना बाजीराव मस्तानी पाहण्याचा सल्ला दिला आहे. काही लोकांना या पोस्टमधून अनेक प्रश्न उभे राहिले तर अनेकांनी याचं कौतुक केलं आहे.