दीपिकाने ज्या रुग्णालयात मुलीला जन्म दिला, तिथली एक दिवसाची फी किती?

Deepika-Ranveer Baby Girl : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंहच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिलाय. दीपिकाची प्रसूती मुंबईतल्या HN रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात झाली. 

राजीव कासले | Updated: Sep 9, 2024, 06:43 PM IST
दीपिकाने ज्या रुग्णालयात मुलीला जन्म दिला, तिथली एक दिवसाची फी किती? title=

Deepika-Ranveer Baby Girl : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आई-बाबा झाले आहेत. दीपिकाने रविवारी सकाळी मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात एका मुलीला जन्म (Baby Girl) दिला. या जोडप्याने सोशल मीडियावर पोस्ट करत लेकीच्या जन्माचा सोहळा साजरा केला आहे. 'स्वागत बेबी गर्ल! 8.9.2024' अशी खास पोस्ट शेअर केली आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांनी 2018 साली लग्न केलं. लग्नाच्या सहा वर्षांनी जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.

प्रसूतीच्या एक दिवस आधी रणवीर आणि दीपिकाने शुक्रवारी मुंबईतल्या दादर इथल्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊ गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. शनिवारी दीपिकाला मुंबईतल्या Sir H. N. Reliance Foundation Hospital मध्ये दाखल करण्यात आलं. रविवारी दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिला. दीपिकाच्या आधीर याच रुग्णालयात अभिनेत्री आलिया भट्टचीही प्रसूत झाली आहे.

एका दिवसाची फी

एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटलच्या बेवसाईटमध्ये दिलेल्या माहितीनुसार या रुग्णालयात प्रसूतीसाठी एका दिवसाचा खर्च 1700 ते 15000 रुपये इतका आहे. याशिवाय प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या नातेवाईकांसाठी वेगळा रुम उपलब्ध आहे. रुग्णालात दाखल असलेल्यांच्या मनोरंजनासाठी 24 तास मोफत वाय-फाय सुविधा आहे. एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय हे मुंबईतील प्रसिद्ध आणि मोठ्या रुग्णालयांपैकी एक आहे. दीपिकाने मुलीला जन्म दिल्यानंतर रणवीर सिंहच्या आनंदला पारावर राहिलेला नाही. दीपिकाच्या पोटी मुलीनेच जन्म घ्यावा असं रणवीर सिंहने एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्याची ही प्रार्थना देवानेही ऐकली.

प्रेग्नंसी फोटोशूट

दीपिका पादुकोणने प्रसूतीच्या काही दिवस आधी प्रेग्नंसी फोटोशूट केलं होतं. या फोटोत दीपिका ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली होती. यात पती रणवीर सिंहसोबत तीने पोझ दिल्या आहेत. दीपिका पादुकोणला दिलेल्या तारखेच्या वीस दिवस आधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सी-सेक्शन डिलिव्हरीद्वारे दीपिकाने मुलीला जन्म दिला. दीपिकाने याच वर्षी 28 फेब्रुवारीला सोशल मीडियावर आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती.

दीपिका-रणवीरचे आगामी चित्रपट

दीपिका पादुकोणचा 'कल्कि 2898 AD' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात चित्रपटात दीपिकाने एका गर्भवती महिलेचं पात्र साकारलं होतं. आता दीपिका रोहित शेट्टीच्या 'सिंघन अगेन' या चित्रपटात दिसणार आहे. रणवीर सिंहही या चित्रपटात भूमिका साकारणार आहे.