Bollywood Celebrity Electricity Bill: सामान्य माणसाचं सर्वात मोठं टेन्शन असतं ते म्हणजे वीज बिल (Electricity Bill). महिन्याचं बजेट (Budget) आखताना वीज बिल थोडं जरी जास्त आलं की आपलं बजेट कोलमडतं. पण तुम्हाला माहित आहे का? मोठमोठे बंगले आणि अपार्टमेंटमध्ये रहाणारे बॉलिवूड स्टार्स (Bollywood Stars) किती वीज बिल भरतात. वीज बिलाचे आकडे ऐकून सामान्य माणसाचे डोळे नक्कीच गरगरतील. आपले आवडते अभिनेते, अभिनेत्रींची लाईफस्टाईल, त्यांचे कपडे, ते कुठे रहातात हे जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. पण आज आम्ही तुम्हाला कोणता बॉलिवूड स्टार किती वीज बिल भरतो याविषयी सांगणार आहोत.
मिस्टर परफेक्टनिस्ट अर्थात बॉलिवूड स्टार अमीर खानचा (Amir Khan) मुंबईत एका अलिशान अपार्टमेंटमध्ये रहातो. तो रहात असलेल्या घराचं महिन्याचं वीज बिल 9 ते 11 लाख रुपये इतकं येतं.
रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पदूकोण (Deepika Padukone) हे सेलिब्रिटी कपलही लाखोंच्या घरात वीज बिल भरतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार ते रहात असलेल्या 4 BHK फ्लॅटचं वीज बिल अंदाजे 13 ते 15 लाख रुपये महिना इतकं असतं.
बॉलिवूडचा भाईजान अर्थात सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) सध्या आपल्या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. याशिवाय आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्याची कायमच चर्चा होत असते. सलमान खान रहात असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटचं वीज बिल जवळपास 20 ते 25 लाख रुपयांपर्यंत जातं.
अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आपला पती विक्की कौशलसह (Vicky Kaushal) मुंबईत एका 4 BHK अपार्टमेंटमध्ये रहाते. मीडिया रिपोर्टनुसार या अपार्टमेंचं वीज बिल अंदाजे 8 ते 10 लाख रुपयांपर्यंत येतं.
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा मुंबईत अलिशान बंगला आहे. करिना आणि सैफ या बंगल्याचं जवळपास 30 ते 32 लाख रुपये वीज बिल भरतात.
बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा मन्नत बंगला चाहत्यांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय असतो. मुंबईतल्या त्याच्या या घराबाहेर हजारो चाहत्यांची गर्दी असते. बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त वीज बिल भरण्यात शाहरुख खान अव्वल स्थानी आहे. मन्नत बंगल्याचं महिन्याचं वीज बिल जवळपास 43 लाख रुपये इतकं असतं.
बिग भी अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुंबईत अनेक घरं आहेत. पण आपल्या कुटुंबासह ते जुहू इथल्या बंगल्यात रहातात. मीडिय रिपोर्टनुसार या बंगल्याचं वीजेचं बिल 20-22 लाखाच्या घरात येतं.