मुंबई : निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. अनेक अभिनेत्री राजकारणात सक्रिय आहेत. तर काही पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. पण अभिनेत्री नंतर राजकारणात उतरलेल्या स्त्रियांना अपमानकारक पद्धतीने पाहिले जाते. अभिनय करून राजकारणात उतरणाऱ्या स्त्रियांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते. पण असे कधी अभिनेत्यांसोबत झालेले नाही. असे परखड मत अभिनेत्री स्पृहा जोशीने मांडले आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी ऐवढी खालची पातळी गाठतात. प्रचार हा सामाजिक मुद्द्यांना धरून होऊ शकत नाही? अशा परिस्थितीत महिलांनी एकमेकींच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. असे मत स्पृहाने मांडले आहे. स्पृहाने फेसबुकच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.