Esha Deol : बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलनं मासिक पाळीच्या वेळी घरी असणाऱ्या निर्बंधांबद्दलविषयी सांगितलं. त्यावेळी तिनं सांगितलं की लहानाची मोठी होण्या दरम्यान, मासिकपाळीविषयी मोकळेपणानं बोललं जात नव्हतं. मंदिरमध्ये जाणं आणि पूजा किंवा पार्थना करण्यासाठी देखील परवानगी नव्हती. रुढी-परंपरा माननारं माझं कुटुंब आहे, पण ती या सगळ्या गोष्टीचं पालन करत नव्हती. या सगळ्या गोष्टी तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितल्या आहेत.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लेक ईशा देओलनं 'हाउटरफ्लाय'शी बोलताना सांगितलं की 'आम्हाला मंदिरात जाऊन प्रार्थना करण्याची परवानगी नव्हती. जेव्हा मासिकपाळी संपायची, तेव्हा केस धुतल्याशिवाय पूजा करू शकत नव्हतो. ही गोष्ट एक रुढि-परंपरेचा भाग आहे. जर या गोष्टी राहत असलेल्या घरात होत असतील तर मी त्यांचा आदर-सन्मान करते.'
ईशानं हे देखील सांगितलं की तिची आजी ही शिस्तप्रिय होती. आम्हाला बाहेर जानाता शॉर्ट स्कर्ट परिधान करण्याची परवानगी नव्हती. याविषयी सांगत ईशा म्हणाली, 'माझी आजी घरातला सीसीटिव्ही कॅमेरा होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागरण करण्यास मनाई होती.'
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशानं सांगितलं की सेटवर को-स्टारला मिठी मारण्याची एक खास पद्धत शिकवली. तिला सांगितलं की हात पुढे करून पुरुष सह-कलाकारांना मिठी मारायची जेणेकरून तिला जर अस्वस्थ वाटू लागले तर ती त्यांना मागे ठकलू शकेल.
धर्मेंद्र यांची इच्छा होती की ईशाचं लवकर लग्न झालं पाहिजे. ईशानं याविषयी सांगितलं की 'वडिलांची इच्छा नव्हती की मी चित्रपटांमध्ये काम करू. ते पंजाबी वडील असतात तसेच होते आणि त्यांची इच्छा होती की मी 18 वर्षांची झाली तेव्हाच लग्न करू. ही त्यांची अट होती, ते अशा लोकांमध्ये राहिले आहेत जिथे महिलांचं खूप लवकर लग्न व्हायचं. पण माझं संगोपन वेगळ्या पद्धतीनं झालं.'
दरम्यान, ईशाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर गेल्यावेळी ती 'हंटर: टूटेगा नहीं तोडेगा' मध्ये दिसली होती. यात ईशासोबत सुनील शेट्टी, बरखा बिष्ट आणि राहुल देव महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. दरम्यान, त्यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ईशानं 2012 मध्ये बिझनेसमॅन भरत तख्तानीशी लग्न केलं. त्यांना दोन मुली आहेत. तर लग्नाच्या 12 वर्षांनंतर ईशा आणि भरत यांचं लग्न मोडलं आणि 2024 मध्ये ते विभक्त झाले.