'Aashram 3' पूर्वी ईशा गुप्ता करत होती 'हे' काम, खुद्द अभिनेत्रीकडूनच खुलासा

'दिग्दर्शकांना दिवस रात्र फक्त...', आश्रममध्ये वर्णी लागण्याआधी ईशाने केलयं असं काम... व्हिडीओ व्हायरल   

Updated: May 28, 2022, 11:26 AM IST
'Aashram 3' पूर्वी ईशा गुप्ता करत होती 'हे' काम, खुद्द अभिनेत्रीकडूनच खुलासा title=

मुंबई : अभिनेता बॉबी देओल फेम 'आश्रम 3' वेब सीरिजची सध्या तुफान चर्चा रंगत आहे. सीरिजमध्ये 'बाबा निराला' च्या भूमिकेत बॉबी झळकणार असून अभिनेत्री ईशा देओल देखील बोल्ड सीन देताना दिसणार आहे. सध्या ईशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ईशाने सीरिजपूर्वी घडलेल्या गोष्टींचा खुलासा केला आहे. झी न्यूजच्या एक्सक्लूसिल मुलाखतीत ईशाने अनेक गोष्टी सांगितल्या. 

झी न्यूजशी बोलताना ईशा गुप्ता म्हणाली की, 'पहिल्यांदा मला श्रुतीचा फोन आला की, वेब सिरीजसाठी प्रकाश झा तुझ्या नावाचा विचार करत आहेत. यानंतर कोविडमध्ये हो आणि नाही या विचारात जवळपास 5-6 दिवस निघून गेले. '

पुढे ईशा म्हणाली, 'सरांनी मला सांगितलं दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट करण्यात आलं आहे. त्यानंतर मी दिवस रात्र दिग्दर्शकांना गुड मॉर्निंग ते गुड नाईट  मेसेज करायची....'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Esha Gupta (@egupta)

'मी नेहमी दिग्दर्शकांना विचारायची नक्की काय झालं आहे... शेवटी मला जे हवे होते ते मला मिळालं. पण सीरिजमध्ये माझी वर्णी लागेपर्यंत मी दिग्दर्शकांना प्रचंड त्रास दिला...' सध्या ईशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.