Bhool Bhulaiyaa 3 Beats Singham Again: दिवाळीच्या सणामध्ये बॉलिवूडमध्ये धमाका होणार आहे. ज्यामध्ये 'भूल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन' हे दोन मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहेत. कारण कार्तिक आर्यन त्याच्या हॉरर आणि कॉमेडी चित्रपटासह मोठ्या पडद्यावर धडकणार आहे. तर दुसरीकडे, अजय देवगन आणि रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्स चित्रपट 'सिंघम अगेन' या चित्रपटातून खळबळ उडवून देणार आहे. अशातच आता कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटाने अजय देवगनच्या 'सिंघम अगेन' चित्रपटाला मागे टाकले आहे.
'भूल भुलैया 3' चे दिल्ली-यूपीमध्ये जास्त शो
मीडिया रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी आणि विद्या बालन यांच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटाला दिल्ली आणि यूपीमध्ये अजय देवगनच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटा पेक्षा जास्त सिंगल स्क्रीन मिळाल्या आहेत. यामध्ये थिएटर चालकांनी 'भूल भुलैया 3' या चित्रपटाला दिवसातून 3 वेळा स्क्रीन दिली आहे. तर 'सिंघम अगेन' चित्रपटाला दिवसातून दोन वेळा स्क्रीन मिळणार आहे.
'सिंघम अगेन'च्या निर्मात्यांनी थिएटर चालकांशी हा करार मान्य केलेला नाही. अशा देखील बातम्या समोर येत आहेत. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'सिंघम अगेन' चित्रपटाला पाचही शो मिळतील. जर असे झाले तर 'भूल भुलैया 3' बॉक्स ऑफिसवर 'सिंघम अगेन' पेक्षा जास्त कमाई करेल हे निश्चित.
'सिंघम अगेन'मध्ये सलमान खान दिसणार
रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अजय देवगनसह करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर दीपिका पदुकोण हे लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. त्यासोबतच या चित्रपटात रणवीर सिंग आणि अक्षय कुमार देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत. अभिनेता टायगर श्रॉफने देखील या चित्रपटात एन्ट्री घेतली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'सिंघम अगेन' या चित्रपटात चुलबुल पांडे म्हणजेच सलमान खान देखील या चित्रपटात कॅमिओ करणार आहे. अशा परिस्थितीत सलमान खान हा अजय देवगनला चित्रपटात सपोर्ट करणार आहे. 'सिंघम अगेन' हा चित्रपट 1 नोव्हेंबरला सर्व थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते देखील प्रचंड उत्सुक आहेत.
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 154/7
|
VS |
BRN
157/4(16.2 ov)
|
Bahrain beat Tanzania by 6 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.