मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने 14 मार्च रोजी त्याचा 57 वा वाढदिवस साजरा केला आहे. 14 मार्च 1965 रोजी मुंबईत जन्मलेल्या आमिर खानने सोमवारी आपला वाढदिवस साजरा केला. या पार्टीत आमिर खानचे अनेक जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. याचबरोबर त्याची पहिली पत्नी रीना दत्ता देखील या पार्टीचा सहभागी झाली होती. रीना दत्ता तिची दोन मुलं मुलगा जुनैद आणि मुलगी आयरासोबत आमिर खानच्या बर्थडे पार्टीत पोहोचली.
या 20 वर्षांत रीना दत्ता पूर्वीपेक्षा खूपच वेगळी दिसत होती. यादरम्यान रीनाला ओळखणं देखील खूप कठीण झालं होतं. रीनाचं वजन खूप वाढलं आहे. यावेळी रीना ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये दिसली. आमिर खानने दोन लग्नं केली, पण आता अभिनेत्याने दोन्ही पत्नींपासून घटस्फोट घेतला आहे. आमिर आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता 16 वर्षे एकत्र होते.
रीना दत्ता ही आमिर खानची पहिली पत्नी आहे. चित्रपटांमध्ये हात आजमावण्यापूर्वीच आमिरने आपल्या घरासमोर राहणाऱ्या रीना दत्ताला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. रीनाला इम्प्रेस करण्यासाठी आमिरने आपल्या रक्ताने एक लव्हलेटरही लिहिलं होतं. त्याच्या या वागणूकीबद्दल रीनाने त्याला खूप फटकारलंही होतं. रीना आणि आमिरने 18 एप्रिल 1986 रोजी धर्माचा विचार न करता घरातून पळून जाऊन लग्न केलं. लग्नाच्यावेळी आमिर 21 वर्षांचा आणि रीना 20 वर्षांची होती.
या दोघांना मुलगा जुनैद आणि मुलगी आयरा अशी दोन मुलं आहेत. रीनाशी घटस्फोट घेतल्यानंतर आमिरने 2005 मध्ये किरण रावशी लग्न केलं. पण 2021 मध्ये त्यांचाही घटस्फोटही झाला. आमिर खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच तो 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे.