लग्नाच्या चर्चांदरम्यान Vicky Kaushalचा खास फोटो व्हायरल

Vicky Kaushalचा फोटो व्हायरल होताचं युझर्स म्हणाले, 'अता तरी खरं काय ते सांग?'  

Updated: Nov 28, 2021, 08:36 AM IST
लग्नाच्या चर्चांदरम्यान Vicky Kaushalचा  खास फोटो व्हायरल

मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ लवकरचं लग्न करणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काहीदिवसांपासून जोर धरला आहे. 9 डिसेंबर रोजी विकी आणि कतरिना लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  लग्नाबद्दल रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. मात्र, आतापर्यंत विकी कौशल आणि कतरिना कैफकडून लग्नाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. 

दरम्यान, आता विक्की कौशलने स्वतःचा एक फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. फोटोमध्ये विकी कौशल कॅमेरासोबत दिसत आहे. फोटोमध्ये तो अत्यंत आनंदी दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, 'जगातील सर्वात आवडते ठिकाण.' फोटो पाहा..

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

विकीचे फोटो पाहून लोक त्याला लग्नाबद्दल अनेक प्रश्न विचारत आहेत. कुणी म्हणतंय की, 'आता खरं सांग विकी बाबू', तर एका चाहत्यानं लिहिलंय, 'आम्ही लग्न इतकं गुप्त ठेवत नाही.' त्याचवेळी एकाने 'कृपया लग्न कन्फर्म करा सर' असे लिहिले...

एका रिपोर्टनुसार, विकी आणि कतरिना 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा रिसॉर्टमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. कतरिना कैफच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, लव्हबर्ड्स हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करतील. 7 व 8 डिसेंबर रोजी संगीत व मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे. दोघांच्या चाहते त्यांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत.