'Excuse me, हे माझे पैसे', दीपिका भडकली

पाहा व्हिडिओ

Updated: Jan 5, 2020, 11:37 AM IST
'Excuse me, हे माझे पैसे', दीपिका भडकली title=

मुंबई : आजच्या दिवशी 5 जानेवारीला दीपिका पदुकोण आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या दीपिका तिच्या 'छपाक' या सिनेमामुळे चर्चेत आली आहे. दीपिका या सिनेमात ऍसिड पीडित तरूणी लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारणार आहे. तसेच या सिनेमात दीपिकाने निर्मितीची बाजू देखील सांभाळली आहे. 

यासंदर्भात 'छपाक' च्या टायटल साँगच्या लाँच वेळी दीपिका पत्रकारावर रागावल्याच समोर आली. दीपिकाने सिनेमात लावलेला पैसा हा रणवीर सिंहचा का? असा प्रश्न विचारल्यावर, 'Excuse me, हे माझे पैसे आहेत' अशी जाहीर कबुली दीपिकाने दिली. पत्रकाराने यावेळी रणवीरचे म्हणजे घरातले पैसे गुंतवले का? असा सवाल केला. तेव्हा रणवीर सिंहचे पैसे नसून मी माझे पैसे या सिनेमांत गुंतवले आहेत असं उत्तर दीपिकाने दिले.  

दीपिकाचा 'छपाक' सिनेमा 10 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच दिवशी अजय देवगनचा 'तान्हाजी' हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हे दोन्ही सिनेमे आमने सामने आल्यामुळे चाहत्यांचा तर गोंधळ होणारच आहे. पण या सिनेमांना देखील बॉक्स ऑफिसवर फटका पडेल यात शंका नाही.