खासदार अमोल कोल्हे करणार 'ह्या' अभिनेत्रीशी लग्न? इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत..

Amol Kolhe Amruta Khanvilkar: अमोल कोल्हे यांच्या पोस्टमध्ये, खासदार डॉ. अमोल कोल्हे अमृता खानविलकर (Amrita Khanwilkar) बरोबर लग्न करणार, या मथळ्याखाली फेक बातमी (Fake news) लिहिलेली आहे. 

Updated: Apr 2, 2023, 11:23 AM IST
खासदार अमोल कोल्हे करणार 'ह्या' अभिनेत्रीशी लग्न? इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत.. title=
Amol Kolhe,Amruta Khanwilkar

Amol Kolhe Amruta Khanvilkar: शिरूरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकतंच त्यांना दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला. त्यामुळे त्यांच्या कामाची नेहमी चर्चा होताना दिसते. तर त्यांच्या अभिनय पात्रामुळे त्यांचा वेगळा चाहता वर्ग आहे. अशातच आता कोल्हे पुन्हा चर्चेत आले आहेत, ते (Amol Kolhe Post) एका सोशल मीडिया पोस्टमुळे... एप्रिल फूलच्या निमित्ताने अमोल कोल्हे यांची पोस्ट चर्चाचा विषय ठरत आहे.

अमोल कोल्हे यांच्या पोस्टमध्ये, खासदार डॉ. अमोल कोल्हे अमृता खानविलकर (Amrita Khanwilkar) बरोबर लग्न करणार, या मथळ्याखाली फेक बातमी (Fake news) लिहिलीये. त्यामध्ये अमृता खानविलकर आणि अमोल कोल्हे लग्न करणार असल्याची अफलातून रंगवलेली बातमी दिसत आहे. ही बातमी वाचून अनेकांना हसू आवरलं नाही.

आणखी वाचा - Samir Choughule ने शेअर केला 25 वर्षं जुना फोटो, म्हणाले...

काय होती ती बातमी?

"राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे सध्याच्या बायकोला कंटाळले आहेत. 'वाजले की बारा' फेम अमृता खानविलकर हिच्या प्रेमात ते पागल झाले आहेत. लवकरच ते पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन व अमृता खानविलकर तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट देऊन दोघे विवाहबध्द होणार असल्याचे चित्रपटक्षेत्रात बोलले जात आहे. 'या विवाहाचा माझ्या राजकीय कारकीर्दीवर काहीही परिणाम होणार नाही. उलट अमृताशी लग्न केल्यामुळे मी पण उपमुख्यमंत्री होऊ शकेन कारण अमृता हे नावच लकी आहे राजकारण्यांना' असे ते म्हणाले", अशी ही बातमी आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

Amol Kolhe काय म्हणतात?

दरम्यान, हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं? नशीब बायकोला आज 1 एप्रिल आहे हे माहित होतं… नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी खळखळून हसवलं आहे.