Rashid Khan Death: लोकप्रिय गायक आणि शास्त्रीय संगीताचे प्रतिभावन असलेले राशिद खान यांचे निधन झाले आहे. वयाच्या 55 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. राशिद खान यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना कोलकाता येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि ते ऑक्सिजन सपोर्टवर होते. अथक प्रयत्न केल्यानंतरही त्यांना वाचवण्यात यश मिळालं नाही,
राशिद खान यांना 21 नोव्हेंर रोजी स्ट्रोक आला. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्याशिवाय ते गेल्या अनेक दिवसांपासून प्रोस्टेट कॅन्सर त्रस्त होते. डिसेंबर महिन्यापासून त्यांची तब्येत ही बिघडली होती तर त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर 23 सप्टेंबर रोजी ते रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर त्यांची तब्येत आणखी गंभीर झाली त्यांना अनेक दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. इतकंच नाही तर ते व्हेंटिलेटरवर देखील होते. दरम्यान, असं म्हटलं जातं की सुरुवातीला त्यांच्यावर मुंबईच्या टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना कोलकाताला शिफ्ट करण्यात आलं.
राशिद खान यांच्या विषयी बोलायचे झाले तर उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा जन्म झाला होता. तर लहानपणापासून ते संगीताचं शिक्षण घेत होते. त्यांना यासाठी त्यांनी कोणत्याही बाहेर जाण्याची गरज भासली नाही. त्यांनी आदोबा उस्ताद निसार हुसैन खान यांच्याकडून संगीताचं शिक्षण केलं. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी स्टेजवर परफॉर्म केलं होतं. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली.
हेही वाचा : 'आम्ही इकोनॉमीनं प्रवास करतो आणि..., अक्षयच्या स्फाटपेक्षा कमी मानधन मिळतं'; अभिनेत्याचा खुलासा
करीना कपूर आणि शाहिद कपूरच्या 'जब वी मेट' या चित्रपटातील 'आओगे जब तुम साजना' हे गाणं त्यांनीच गायलं आहे. त्यांचं हे गाणं चांगलंच लोकप्रिय ठरलं. याशिवाय त्यांच्या तोरे बिना मोहे चैन नहीं' हे गाणं देखील तितकंच गाजलं होतं. शाहरुख खानच्या 'माय नेम इज खान' शिवाय 'राज 3', 'कादंबरी', 'शादी में जरूर आना', 'मंटो' पासून 'मीटिन मास' सारख्या चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांची गाणी ऐकल्यानंतर त्यांच्या मधूर आवाजानं सगळेच मंत्रमुग्ध होऊन जातात. राशिद खान यांना पद्मश्री आणि पद्मभूषण देऊन सन्मानीत करण्यात आलं.