प्रसिद्ध संगीतकार सितारवादक अन्नपूर्णा देवीचे निधन

91 व्या वर्षी झाले निधन 

प्रसिद्ध संगीतकार सितारवादक अन्नपूर्णा देवीचे निधन  title=

मुंबई : भारत रत्नने सन्मानित केलेल्या दिवंगत सितारवादक पंडित रविशंकर यांची पत्नी आणि दिग्गज संगीतकार अन्नपूर्णा देवी यांच शनिवारी मुंबईती ब्रीच कँडी रूग्णालयात निधन झालं. हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली. 91 वर्षांच्या अन्नपूर्णा देवी यांचा आणि पंडित रविशंकर यांचा घटस्फोट झाला होता. 

रूग्णालयातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 वाजून 51 मिनिटांनी त्यांच निधन झाले. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या आजारी होत्या. संगीताच्या जगातील अन्नपूर्णा देवी यांचे नाव रोशनआरा खान असं होतं. त्यांचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला होता. अन्नपूर्णा देवी या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध भारतीय सुरबहार वादक होत्या. 

त्या भारतीय शास्त्रीय संगीताच्या दुनियेतील लोकप्रिय नाव अलाउद्दीन खान यांच्या मुलगी आणि शिष्या होत्या. तर लोकप्रिय तारवादक पंडित रविशंकर यांच्यासी लग्न केलं. त्यानंतर त्यांच लग्न मोडलं.