प्रसिद्ध संगीतकार यशवंत देव यांचा ९१ वा वाढदिवस

प्रसिद्ध संगीतकार, गायक आणि कवी यशवंत देव यांचा ९१ वा वाढदिवस. देवगाणी गाणाऱ्या आणि जगभरातील मराठी रसिकांना आपल्या गाण्यांनी तृप्त करणाऱ्या, मंत्रमुग्ध करणाऱ्या या ज्येष्ठ आणि उत्साही संगीतकाराला कृतज्ञता म्हणून मानाचा मुजरा.

Updated: Nov 1, 2017, 09:04 PM IST
प्रसिद्ध संगीतकार यशवंत देव यांचा ९१ वा वाढदिवस  title=

मुंबई : प्रसिद्ध संगीतकार, गायक आणि कवी यशवंत देव यांचा ९१ वा वाढदिवस. देवगाणी गाणाऱ्या आणि जगभरातील मराठी रसिकांना आपल्या गाण्यांनी तृप्त करणाऱ्या, मंत्रमुग्ध करणाऱ्या या ज्येष्ठ आणि उत्साही संगीतकाराला कृतज्ञता म्हणून मानाचा मुजरा.

स्वर आले दुरूनी, प्रिया आज माझी नसे साथ द्याया, जीवनात ही घडी अशीच राहू दे, कोटी कोटी रुपे तुझे कोटी सूर्य, चंद्र, तारे, अशी पाखरे येती आदी एकाहून एक सुमधूर गाणी आणि या वयातही तितकाच खळाळता उत्साह दिसून येत आहे. फक्त गायक म्हणून नव्हे, तर एक एव्हरग्रीन संगीतकार आणि कवी म्हणूनही त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवलाय. 

शब्दसुरांच्या मैफलीत नेहमीच स्वतःला एका वेगळ्याच उत्साहाने झोकून देणाऱ्या यशवंत देवांना ९१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने झी  २४ तासच्यावतीने लक्ष लक्ष शुभेच्छा.