Actor Milind Gawali Instagram Post: मराठी मालिका (Marathi Television Serials) या आता खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. मालिकांमधील प्रत्येक भुमिका ही सर्वांच्याच मनात लोकप्रिय झाली आहे. या मालिकांमधील सर्वच कलाकार हे सोशल मीडियावरही (Marathi Actors on Social Media) एक्टिव असतात. आपल्या चाहत्यांना अपडेट ठेवण्यासाठी ते कायमच तत्पर असतात. त्यामुळे त्यांच्या फोलोवर्समध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होते. फक्त त्यांचे पर्सनल फोटोज किंवा त्यांच्या वेकेशनमधील फोटोज नाही तर कलाकारांच्या आयुष्यातील अनेक किस्से (Celebrity Photos on Instagram) आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनाही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक कलाकार आहे ज्याची सध्या त्याच्या फॅन्समध्ये खूप चर्चा आहे आणि तो म्हणजे मिलिंद गवळी. (Famous serial aai kuthe kay karte actor milind gawali shares a post on instagram stating how ashok saraf helped him to focus on his acting rather than his tantrums entertainment news in marathi)
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून अभिनेता मिलिंद गवळी (Aniruddha in Aai Kuthe Kay Kartey) हा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला आहे. गेल्या अनेक वर्षात आपण मिलिंद गवळीला अनेक भुमिकांमधून पाहिले आहे. सलग तीन वर्षे सुरू असलेल्या 'आई कुठे काय करते' या मालिकेनं अनिरूद्धला म्हणजेच मिलिंद गवळीला चाहत्यांचे विशेष प्रेम मिळाले आहे. त्याच्या खलनायिकी भुमिकेमुळे तो विशेष चर्चेत असतो. त्याच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक होतानाही दिसते.
मिलिंद गवळी सोशल मीडियावरही खूप एक्टिव आहे. त्याचेही इन्टाग्रामवर असंख्य चाहते आहेत. त्याच्या पोस्टही (Milind Gawali Instagram) अनेकदा चर्चेचा विषय असतात. सध्या त्याची एक पोस्ट सर्वांचेच विशेष लक्ष वेधून घेतले आहे. ज्यात त्यानं ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा विशेष उल्लेख केला आहे. तुम्हालाही नक्कीच उत्सुकता लागून राहिली असेल की या पोस्ट असं मिलिंदनं म्हटलं तरी काय आहे. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया सध्या व्हायरल होत असलेल्या मिलिंद यांच्या या (Viral Instagram Post) पोस्टविषयी.
कलाकारांना आपल्या कम्फर्टझोनमधून बाहेर यावे लागते. तेव्हा कुठे जाऊन अनेक गोष्टी आत्मसाद करण्याची सवय त्या कलाकाराला लागते. कलाकारांना काम करताना अनेक गोष्टी या सांभाळाव्या लागतात. त्यातील मुख्य गोष्ट म्हणजे कपडे. फॅशन नसेल तर पिक्चर किंवा सिरियलमधला एक सीन उठावदार होणंही कठीण होऊ जाते. अनेकदा कलाकार यामध्ये किरकीरही करताना दिसतात. आपल्याला असेच ड्रेस हवेत अथवा कपडे हवेत असा काहीसा कलाकारांचा हट्ट असतो तर कधी कधी अनेकदा कलाकारांना कपडेही आवडत नाहीत. परंतु त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये हे सांभाळून घ्यावेच लागते.
अभिनेता मिलिंद गवळीनंही यावर (Actor Milind Gawali Instagram Post) आपली एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो म्हणतो की, ''लहानपणापासून आपल्याला काही गोष्टी आवडत असतात तर काही नाही. त्यातून खाद्यपदार्थांसाठीही लागू होते. काहींना गोड आवडतं तर काहींना तिखट. माझेही लहानपणीचे खाण्यापिण्याचे खूप नखरे होते आणि आई माझे लाड पुरावायचे. माझ्यासाठी वेगळा स्वयंपाक केला जायचा, दहावीनंतर वडिलांनी मला नाशिकला भोसला मिलिटरी स्कूलमध्ये पाठवलं. पहिल्याच दिवशी ताटात जे जेवण आलं. माझ्याबरोबर अनेकांनी तोंडं वाकडी केली, थोडसं खाल्लं आणि ताटात अन्न टाकून उठलो. मेजर राठोड आले शांतपणे म्हणाले “ खाना पुरा खतम करो , एक दाना भी प्लेट मे नही बचना चाहिए” आणि आम्हाला बंदूक घेऊन मोठ्या ग्राउंडला दहा राऊंड मारायची शिक्षा.'' अशी त्यानं त्याच्या लहाणपणीची आठवण सांगितली आहे.
तो म्हणाला की, ''हे असंच त्याचे कपड्यांच्या बाबतीतही चालू होते. हे कपडे आपल्याला शोभत नाही. त्याचबरोबर आपल्याला हा रंग आवडत नाही त्यामुळे मीही अनेकदा नखरे करायचो. अनेक वर्ष सिनेमांमध्ये मी माझे स्वतःचेच कपडे घेऊन जायचं कारण कपड्यांसाठी मराठी सिनेमाचं बजेट खूप कमी असायचं त्यामुळे त्यांचे साधे स्वस्तातले कपडे मला कधीच आवडले नाहीत, ती माझी सवय अशोक सराफांमुळे मोडली, माझे कपड्यांचे नखरे बघून ते एक दिवस मला म्हणाले “प्रेक्षक कपडे नाही अभिनय बघतात अभिनयाकडे लक्ष दे, मी दोन झब्बा पायजमा वर हीट सिनेमे केले आहेत “ आणि त्यानंतर सिनेमा असो सिरीयल असो मी मला जे कपडे ते देतील ते आजपर्यंत निमूटपणे घालत आलो'', असे त्यानं सांगितलं.
या पोस्टच्या शेवटी त्यानं त्या सगळ्यांचे आभार मानले आहेत ज्यांच्यामुळे तो या कम्फर्टझोनमधून बाहेर येऊ शकला. सध्या त्याची ही पोस्ट सगळीकडेच व्हायरल होते आहे.